8 January 2025 12:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: YESBANK Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, या फंडात मल्टिबॅगर परतावा मिळेल, 130 टक्क्याने कमाई करा SBI Mutual Fund | बिनधास्त महिना बचत करा SBI फंडाच्या या योजनेत, SIP वर मिळेल 1 कोटी 22 लाख रुपये परतावा EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स
x

BREAKING | अजित पवार आणि राम शिंदेंची गुप्त बैठक? | काय आहे शक्यता? - सविस्तर वृत्त

मुंबई, १३ जून | राज्यात जाहीर आणि गुप्तभेटींचा हंगाम सुरू आहेच. अहमदनगरमधूनही अशाच एका गुप्तभेटीचे वृत्त समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जाणारे भाजप नेते राम शिंदे यांच्यात शनिवारी (१२ जून) गुप्त बैठक पार पडल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या बैठकीत कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्याबाबत चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. परंतु, साखर कारखान्यावर चर्चा करण्यासाठी गुप्तबैठक का ? असाही सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, राम शिंदे यांनी मात्र हे भेटीचे वृत्त पूर्णपणे नाकारल्याने याबाबतचा संभ्रम कायम आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्याबाबत शनिवारी अजित पवार आणि राम शिंदे यांच्यात एक गुप्तबैठक झाली. ही बैठक साधारणतः अर्धा तास चालली. मात्र, साखर कारखाना इतकाच ह्या भेटीतील चर्चेचा विषय होता की अन्यही कोणत्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली ? हा प्रश्न कायमच आहे. राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकारी असल्याने अजित पवार आणि त्यांची भेट आणखी विशेष ठरते. म्हणूनच, याबाबत आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

कर्जत-जामखेडमध्ये आ. रोहित पवारांची मजबूत पकड:
राम शिंदे यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या कर्जत-जामखेडमध्ये आ. रोहित पवारांची मजबूत पकड बसली आहे. तसेच रोहित पवार यांनी थेट सामान्य कार्यकर्ते ते सामाजिक उपक्रमातून मतदारसंघातील लोकांशी चांगला संपर्क ठेवला आहे. परिणामी भविष्यात राम शिंदे यांना वेगळा मतदारसंघ निवडावा लागू शकतो. तसेच पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा आवाका पुन्हा वाढू लागल्याने इथले मोठे भाजप नेते संभ्रमात असल्याचं वृत्त आहे. दुसऱ्या मतदारसंघात पुन्हा निवडून यायचं म्हणजे ते भाजपमध्ये राहून शक्य नाही. तसेच राज्यातील भाजप नेते विधान परिषदेसाठी इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे फडणवीसांशी जवळीक असूनही काहीच उपयोग होत नसल्याचं अनेकांनी अनुभवलं आहे.

राम शिंदे हे नगरच्या राजकारणात वेगळे पडल्याचं चित्र गेल्या काही काळात पहायला मिळतं आहे. त्यातच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपात मिळणारा मान, त्यानंतर राम शिंदेंच्या विरोधात विखेंनी उघडलेली आघाडी, त्यावरुन शिंदेंची भाजप नेतृत्वावरची नाराजी ह्या पार्श्वभूमीवरही शिंदे आणि अजित पवारांच्या भेटीला मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे. कर्जतमध्ये पराभव झाल्यानंतर राम शिंदे पक्षातही फार कुठे दिसत नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर दबावाचं राजकारण करण्यासाठी तर अशा भेटीगाठी होत नाहीयत ना? असाही एक चर्चेचा सूर आहे.

 

News Title: BJP Former MLA Ram Shinde meet Deputy CM Ajit Pawar news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x