30 December 2024 11:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका Business Idea | गृहिणींसाठी कमी गुंतवणूक आणि जास्त नफा असलेले टॉप 4 व्यवसाय, आजपासूनच सुरुवात करा Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा - NSE: TATAPOWER NTPC Share Price | NTPC शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टम शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: APOLLO
x

आदिवासीच्या झोपडीतील जेवणात कोंबडीचा रस्सा, भाकरी, बिसलेरी पाणी..वाह! : सोमैया

Kirit Somaiya, Sharad Pawar, Jitendra Awhad

शहापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकतंच शहापूरच्या दौऱ्यावर गेले होते. शहापुरमधील दौऱ्याचापाडा येथे एका भुमीपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडदेखील उपस्थित होते. शरद पवार यांनी कार्यक्रम आटोपल्यानंतर तेथील आदिवासी पाड्यातील एका झोपडीत जेवणाचा आस्वाद घेतला. जितेंद्र आव्हाड यांनी झोपडीत जेवतानाचा फोटो शेअर केला असून या नेत्याला काय म्हणावे…अशी भावना व्यक्त केली आहे.

यावेळी कुटुंबातील रामचंद्र खोकडा आणि कमल खोकडा यांची आस्थेवायिक चौकशी करत ‘हे जेवण माझ्या आयुष्यभर स्मरणात राहील’, असे सांगत जेवणाचे कौतुक केले. दरम्यान, पवार यांनी येथील प्राथमिक शाळेत भेट देऊन शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनीदेखील पवार यांच्याशी इंग्रजीमध्ये संवाद साधला. यावेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार सुनील भुसारा, आमदार दौलत दरोडा, जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, विद्या वेखंडे, सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे, शिक्षक प्रमोद पाटोळे, ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य आदी उपस्थित होते.

मात्र यावरून विरोधकांनी राष्ट्रवादीची खिल्ली उडवली आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी यावरून ट्विट करत म्हटलं आहे कि, “शरद पवार आणि जितेंद्र आव्हाडांचं आदिवासी चा झोपडीत जेवण कोंबडीचा रस्सा, भाकरी आणि “बिसलेरी चे पाणी” वाह भाई वाह!!

 

Web Title:  BJP Former MP Kirit Somaiya criticizes Sharad Pawar and Jitendra Awhad.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x