22 December 2024 6:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

भाजपने निर्धार केलाय, महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही - चंद्रशेखर बावनकुळे

BJP Chandrashekhar Bawankule

मुंबई, १७ जून | मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमच्याबरोबर युती करून लढली. केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या करिश्म्याचा फायदा करून घेण्यासाठीच शिवसेना आमच्यासोबत होती. परंतु, शिवसेनेने राष्ट्रवादीसोबतही छुपी युती केली होती, असा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हे धक्कादायक विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची छुपी युती ही गेल्या निवडणुकीतच होती. शिवसेना हा पाठित खंजीर खुपसणारा पक्ष आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार भारतीय जनता पक्षाने केला आहे, असं बावनकुळे यांनी सांगितलं

शिवसेना आणि राष्ट्रवादी हे वेगवेगळे पक्ष आहेत. त्यांचे विचार वेगळे आहेत. त्यांनी कुणासोबत युती करावी हा त्यांचा निर्णय आहे. पण जाणीवपूर्वक आणि जाणीवपूर्वक सांगतो, विधानसभेच्या सहा महिन्यांपूर्वीच सेना-राष्ट्रवादीची युती झाली होती. फडणवीसांचा प्रभाव वापरून अधिकाधिक जागा निवडून आणा आणि पळून या. मातोश्रीचे दरवाजे भाजपला बंद करा, असं आधीच ठरलं होतं. तसा अजेंडा तयार करण्यात आला होता. लपून अजेंडा तयार करण्यात आला होता. पूर्वी छुपी युती केली होती, आता उघड केली आहे. तुम्ही कुणाशीही युती केली तरी आम्हाला फरक पडणार नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

आम्हाला कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना ही पाठित खंजीर खुपसणारा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाच्या पाठित खंजीर खुपसला आहे. शिवसेनेने महाराष्ट्राचं वाटोळं केलं आहे. त्यामुळे जनता शिवसेनेला उभं करणार नाही, असं देखील ते म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: BJP has decided to destroy Shivsena party from Maharashtra said BJP leader Chandrashekhar Bawankule news updates.

हॅशटॅग्स

#Chandrashekhar Bawankule(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x