17 April 2025 2:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

ज्या नेत्यांनाच सध्या राजकीय दयेची गरज त्यांच्यावर ऑपरेशन लोटसची जवाबदारी? सविस्तर वृत्त

Operation Lotus, BJP

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणाऱ्या आणि त्यांना राज्याला स्थिर सरकार देण्याचं आश्वासन देणाऱ्या अजित पवारांना राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवारांनी मोदींना धन्यवाद देणारं ट्विट केल्यानंतर शरद पवारच आपले नेते असल्याचं दुसरं ट्विट केलं. त्यावरुन शरद पवारांनी अजित पवारांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. याशिवाय भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने बहुमत सिद्ध करण्यापूर्वी महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ सुरू केल्याची माहिती आहे. भारतीय जनता पक्षाने कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’ राबवूनच कमळ फुलवलं होतं, त्याच पद्धतीने आता महाराष्ट्रातही ही तयारी सुरू झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र सर्वात हासास्पद गोष्ट म्हणजे राजकारणात वजन शिल्लकच राहिलेलं नसलेल्या नारायण राणे, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे-पाटील आणि बबनराव पाचपुते यांच्यावर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राजकारणात वेगळा पक्ष काढून देखील डाळ न शिजल्याने नारायण राणे (MP Narayan Rane) यांना महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करण्याची वेळ आली आणि त्यात जेव्हा नारायण राणेंनी आपण प्रयत्न करणार असल्याचं म्हटल्यावर सुधीर मुंनगंटीवार यांनी त्याला छेद देत राणेंचं भाजपातील वजन निश्चित केलं होतं.

त्यानंतर काँग्रेसमध्ये विरोधीपक्ष नेतेपदावर राहिलेले राधाकृष्ण विखे-पाटील (MLA Radhakrushna Vikhe Patil) संपूर्ण नगरजिल्ह्यात स्वतःच धापा टाकत निवडून आले आणि नगर जिल्ह्यातील त्यांचं नेमकं अस्तित्व सिद्ध झालं आणि भाजपमध्ये देखील त्यांचं मूल्य कमी झालं. गणेश नाईक (MLA Ganesh Naik) यांचावर विधानसभा निवडणुकीपूर्वी मुलानेच कृपा करण्याची वेळ आली होती, तर बबनराव पाचपुते (MLA Babanrao Pachpute) यांचा मागील इतिहास समजून घेण्यात काहीच अर्थ नाही, कारण सध्या बबनराव पाचपुते नावाचे आमदार राज्यात आहेत हे जरी लोकांना माहित असलं तरी भरपूर म्हणावं लागेल. याच ४ लोकांना सध्या राजकीय कृपेची आवश्यकता असताना त्यांना “ऑपरेशन लोटस” असे एखाद्या लष्करी मोहिमेसारखे शब्दप्रयोग वापरून, त्यांच्यावर सरकार स्थापन करण्याची जवाबदारी देण्यात आल्याच्या बातम्या पेरणी करणं म्हणजे हास्यास्पद म्हणावं लागेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या