15 November 2024 9:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024 Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA
x

बहुमत नसताना शपथविधी हा केवळ आमदार फोडण्यासाठीचा माइंडगेम भाजपवरच उलटणार? सविस्तर

BJP, Shivsena

मुंबई: राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनेपक्षित घडामोडींमुळं राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत आहे.

वास्तविक भारतीय जनता पक्षाकडे असलेला आमदारांचा निकालानंतरच आकडा आजही तेवढाच असल्याचं समोर आहे. आज पहाटे घाईघाईत शपथविधी उरकून घेण्यामागे वेगळीच कारणं तज्ज्ञांनी व्यक्त केली आहेत. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन करणार हे जवळपास निश्चित झालं होतं आणि आज ते बहुमताची यादी राज्यपालांना देऊन पुढील प्रक्रियेला सुरुवात करणार होते. त्यानंतर भारतीय जनता पक्ष विरोधातच बसणार हे निश्चित होणार होतं. दिल्लीत शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर पवार झुकणार किंवा निर्णय बदलण्यास तयार नसल्याची मोदींची खात्री झाली. मात्र बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला काटावरचा आकडा नको होता आणि त्यामुळे अधिकचा म्हणजे जवळपास ४०-४५ आमदारांची आवश्यकता होती. हा आकडा म्हणजे जवळपास एक पक्षच सोबत आणण्यासारखं होतं. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठामपणे एकत्र असल्याने भाजपाकडे तो आकडा म्हणजे एक स्वप्नं होतं.

त्यामुळे महाविकासआघाडी राज्यपालांच्या भेटीला जाण्यापूर्वी एक योजना आखण्याचं ठरलं आणि त्यात बहुमताचा आकडा न घेताच एक वातावरण निर्माण करण्याची योजना काल रात्री दिल्लीत आखली गेली. त्यासाठी भारताच्या इतिहासात भल्यापहाटे मोदींनी कॅबिनेटची बैठक बोलावून राष्ट्रपती राजवट हटवली आणि अजित पवारा पूर्वीपासूनच भाजपच्या संपर्कात असल्याने त्यांना हाताशी धरून एक खेळ ज्याला शेवटचा झुगार म्हणता येईल हे स्पष्ट होतं आहे. कारण, ब्राझील दौऱ्यावर जाण्याच्या दिवशीच मोदींनी अचानक कॅबिनेटची बैठक बोलावून, मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रपती राजवटीचा निर्णय पास केला आणि कोणतीही वाच्यता ना करता परदेश दौऱ्यावर निघून गेले होते. शेतकऱ्यांच्या कोणत्याही निर्णयात मोदी इतके तत्पर दिसत नाहीत, जेवढे राष्ट्रपती राजवटीचा निर्णय पास करताना आणि हटवताना तत्पर दिसले.

या झुगारामागील मागील सर्वात मोठं कारण म्हणजे भाजपच्याच नैत्रुत्वात सरकार येणार असा संदेश देणं. मुळात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्र्वादीसोबत सरकार स्थापन झालं असतं तरी अजित पवार हे उपमुख्यमंत्रीच बनणार होते. त्यामुळे थेट पवार कुटुंबाशी दगाफटका करत ते भारतीय जनता पक्षासोबत पुन्हा उपमुख्यमंत्री पदासाठीच गेले असं समजणं मूर्खपणाचं ठरेल, कारण ते तर त्यांना महाविकासआघाडीत देखील मिळणार होतं. त्यासाठी शेतकऱ्यांच्या सुटकेसाठी आणि भल्यासाठी सरकार स्थापन होणं गरजेचं आहे, अशी रोजची राजकीय पुडी सोडण्यात आली. वास्तविक अजित पवार हे स्वतःवर असलेल्या खटल्यातून सुटका करून घेण्यासाठी भाजपसोबत गेले आहेत. कारण, राज्यात जरी महाविकासआघाडीच सरकार असलं तरी केंद्रात भाजपचं आहे हे त्यांना ठाऊक आहे.

याच शपथविधीच्या नाट्यात दिल्ली ते राजभवन सर्वकाही सोबत असल्याचं एकूण घटनाक्रम सांगतो. विशेष म्हणजे याआधी जेव्हा आदित्य ठाकरेंच्या नैतृत्वाखाली जेव्हा शिवसेनेचं शिष्टमंडळ पाठिंब्याचं पत्र घेऊन गेले होते तेव्हा त्या पत्रात त्रुटी शोधणाऱ्या राज्यपालांना आजच्या राष्ट्रवादी विधिमंडळातील आमदारांच्या एकूण संख्येपैकी केवळ १०-१२ आमदार उपस्थित असताना देखील कोणतीच हरकत नव्हती हे विशेष म्हणावे लागेल. त्यातील ३ आमदार बाहेर पडताच थेट शरद पवारांकडे देखील गेले आणि अजून काही लवकरच येतील असा घटनाक्रम सांगतो. मात्र भाजपच्या या “माईन्ड गेम” प्लानबद्दल अजून प्रसार माध्यमांना देखील माहित नसल्याचं समोर आलं आहे. म्हणजे भाजपने कोणताही बहुमताचा आकडा नसताना केवळ भाजपचाच सरकार येणार हा संदेश सर्वपक्षीय आमदारांच्या डोक्यात सोडण्यासाठी ही योजना आखल्याचं समोर आलं आहे. त्यानुसार शपथविधी कार्यक्रम संपताच भाजपचे तेच दोन तीन चेहरे हात वर करत आणि मूठ आवळत राजभवनातून बाहेर पडले आणि वातावरण गढूळ करून पुन्हा अंडरग्राउंड झाले आहेत.

आता यापुढे ३० नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करायचं आहे आणि जर बहुमत असतं तर ते आजचं सिद्ध केलं गेलं असतं, मात्र ते नसल्याने तारीख घेण्यात आली. त्यानंतर भाजपचे जे आमदार महाविकासआघाडीच्या संपर्कात होते, त्यांना थोपवून थांबण्यासाठी भाग पाडलं. त्यानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेतील आमदारांचा विश्वास ढळमळीत करून त्यांना अमिश दाखवून गळाला लावण्याची प्रक्रिया पार पडण्याची योजना आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार पक्षाशी एकनिष्ठ राहिले तर भारतीय जनता पक्षाचा मोठा पोपट होणार हे आजही निश्चित आहे. कारण भाजपने आमदार फोडण्यासाठी खेळलेला हा केवळ एक माईंडगेम आहे बाकी काही नाही राजकीय तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे महाविकासआघाडीतील एकी अशीच टिकून राहिली आणि अजित पवारांसोबत गेलेले १०-१२ आमदार ज्यामधील ३-४ आधीच परतले आहेत, ते असंच घडलं तर मात्र भाजपचा राजकीय पोपट होणार हे नक्की आहे. कारण सरकार स्थापण्यासाठी १०-१२ नव्हे तर तब्बल ४०-४५ असे अधिकचे आमदार हवे आहेत, जो आकडा म्हणजे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यातील एखादा संपूर्ण पक्षच भाजपमध्ये आणणे असा अर्थ निघतो, जे अशक्य आहे. मात्र एक मोठी घटना अजून घडू शकते आणि ती म्हणजे भाजपने काही आगळीक केलीच तर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष भाजपविरुद्ध आक्रमकपणे थेट रस्त्यावर उतरतील आणि मोठा संघर्ष होण्याची देखील शक्यता आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x