15 November 2024 5:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा
x

शिवसेनेची वाट न पाहता सत्ता स्थापनेची तयारी करण्याचे भाजप श्रेष्ठींचे आदेश?

BJP, Shivsena, Uddhav Thackeray, Sanjay Raut, CM Devendra Fadnavis

मुंबई: मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसलेल्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला बाजूला सारून काँग्रेस -राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन करता येते का, याची चाचपणी सुरू केली असून ‘आम्ही बहुमत सिद्ध करु शकतो’ असा इशारा दिला आहे. भारतीय जनता पक्षाने २०१४ प्रमाणे एकट्यानेच शपथविधी ५ किंवा ६ नोव्हेंबरला घेण्याची तयारी चालविली आहे. पण दोघांत सत्तावाटपाच्या चर्चेत ‘डेडलॉक’ कायम आहे.

शिवसेनेची वाट न पाहता स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली करा, असे स्पष्ट आदेश भाजप श्रेष्ठींनी राज्यातील नेतृत्वाला दिले असल्याची विश्वसनीय माहिती प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मिळाली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाने आपल्या १०५ आमदारांना ५ नोव्हेंबरपर्यंत कोणीही मुंबई सोडून बाहेर जाऊ नका, असे आदेश दिले आहेत. यामुळे दिवाळीनंतर भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार मुंबईमध्येच तळ ठोकून आहेत.

तत्पूर्वी, सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती लागू करण्याबाबत कोणतीही धमकी दिलेली नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. विशिष्ट कालमर्यादेत सरकार स्थापन झाले नाही, तर घटनात्मक पेच निर्माण होतो. या कारणामुळे राष्ट्रपती राजवट लागू होते. मात्र, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी अशी आमची इच्छा नसून राज्याला राष्ट्रपती राजवट परवडणार नाही,असे दानवे यांनी स्पष्ट केले. आम्ही युती धर्माचे पालन करणार आहोत. आमच्या नेत्यांचा बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नये, असेही दानवे म्हणाले.

भारतीय जनता पक्षाने नुकतंच शिवसेनेला अर्थ किंवा महसूल खातं देण्यास तयारी दर्शवली आहे. मात्र या प्रस्तावाला भारतीय जनता पक्षामधील काही नेत्यांनी विरोध आहे. शिवसेनेला अर्थ किंवा महसूल खातं देण्यावरुन भारतीय जनता पक्षामध्ये घमासान सुरु झालं आहे. मात्र जर शिवसेनेला सत्तेत घ्यायचं असेल, तर त्यांना महत्त्वाची खाती देणे गरजेचं असल्याचे भारतीय जनता पक्षामधील एक गटाचे म्हणणे आहे. तर भारतीय जनता पक्षामधील दुसरा गट अर्थ किंवा महसूल खाते देण्यात विरोध करत आहे

भारतीय जनता पक्ष-शिवसेनेमध्ये सध्या कोणाला कोणती खाती द्यावी यावरुन घमासान सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून महत्त्वाच्या खात्यांसाठी दबावतंत्र सुरु आहे. भारतीय जनता पक्षाने नगरविकास आणि गृह खाते देण्यास नकार दर्शवला आहे. त्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला अर्थ किंवा महसूल खातं देण्याची तयारी दर्शवली आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x