22 December 2024 2:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
x

भारतरत्नांची नव्हे | भाजप IT सेलची चौकशी होणार | IT सेलच्या प्रमुखाचंही नाव समोर - गृहमंत्री

BJP IT Cell, Bharatratna, Home minister Anil Deshmukh

नागपूर, १५ फेब्रुवारी: शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पॉप स्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी ट्विट केले होते. या ट्विटनंतर लता मंगेशकर यांच्यासह सचिन तेंडूलकर, कंगना राणावत, रोहित शर्मा, विराट कोहली अशा अनेक सेलिब्रिटींनी एकामागोमाग एक ट्विट करून त्यांना विरोध केला.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या ट्विटची राज्याचा गुप्तहेर विभाग चौकशी करेल असे म्हटले होते. त्यावर देशभरातून टीकेची झोड उठली. त्यानंतर देशमुख यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने ते विलगीकरणात होते. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी सेलिब्रिटींच्या चौकशीसंदर्भात स्पष्टीकरण दिले. (BJP IT Cell under investigations not Bharatratna said home minister Anil Deshmukh)

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. लतादीदी, सचिन तेंडूलकर आमचे दैवत आहेत. त्यांच्या चौकशी आम्ही करणार नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण भाजपच्या आयटीसेलची चौकशी केली जाणार आहे. आयटीसेलचे प्रमुख आणि आणखी काही जणांची नावे समोर आली आहेत. पुढील चौकशी सुरू आहे. या चौकशीतून सत्य परिस्थिती समोर येईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

 

News English Summary: Home Minister Anil Deshmukh said, “My statement has been distorted. Lata Mangeshkar, Sachin Tendulkar are our gods. We will not investigate them. We have respect for them. But BJP’s IT cell will be investigated. The names of BJP IT cell chief and a few others have come to the fore. Further investigation is underway. Deshmukh clarified that the truth will come out from this inquiry.

News English Title: BJP IT Cell under investigations not Bharatratna said home minister Anil Deshmukh news updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x