17 April 2025 10:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

२००९ मधील विधानसभा निवडणुकीवेळी भातखळकरांनी मनसेकडे तिकीट मागितलं होतं - राज ठाकरे

Raj Thackeray

मुंबई, ०१ जून | राज्याच्या राजकारणाचा भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’कडून आयोजित ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूर-संवादमालिकेत राज ठाकरे यांनी त्यांचे विचार सविस्तर मांडले. यावेळी त्यांनी देशातील कोरोना स्थितीवरून देखील सविस्तर भाष्य करताना मोदी सरकारवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं. तसेच राज ठाकरे यांनी दलबदलू राजकीय नेत्यांवर देखील भाष्य केलं.

तसेच निवडणुका आल्या की, पक्षांतराची लाट येते. प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते दुसऱ्या पक्षात जाताना दिसतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २००९मधील विधानसभा निवडणुकीवेळचा असाच एक किस्सा लोकसत्ता’च्या वतीने ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ कार्यक्रमात सांगितला. भाजपाचे नेते आणि मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या आमदार अतुल भातखळकरांविषयी राज ठाकरे यांनी गौप्यस्फोट केला. आमदार अतुल भातखळकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं माझ्याकडे आले होते. मी नितीन गडकरींना फोन केला आणि त्यांना भाजपात राहायला सांगितलं होतं,” असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर जाणाऱ्या नेत्यांविषयी बोलताना त्यांनी अतुल भातखळकरांविषयीचा गौप्यस्फोट केला. २००९ मधील विधानसभा निवडणुकीला भारतीय जनता पक्षाचे अतुल भातखळकर माझ्याकडे तिकीट मागायला आले होते. एक लोखंडे म्हणून होते, तेही माझ्याकडे आले होते. मी नितीन गडकरींना फोन करून सांगितलं. त्यांना सांगितलं होतं की, असं करू नका. ज्या पक्षात इतकी वर्ष वाढलात, राग आला म्हणून असं करू नका. आहात तिथंच रहा, हा वेडपटपणा करू नका. हे सांगत असताना दोन माणसं तिथे होती. त्यांना उभं करू शकतो. हे असं घडतं असतं. शिवसेनेच्या सुरूवातीच्या काळातही अनेक लोक सोडून गेले,” असं राज ठाकरे म्हणाले.

 

News English Summary: Atul Bhatkhalkar of the Bharatiya Janata Party had came to me to ask for a ticket for the 2009 Assembly elections. It was like an iron, it came to me too. I called Nitin Gadkari and told him said Raj Thackeray.

News English Title: BJP leader Atul Bhatkhalkar had came to me to ask for a ticket during the 2009 Assembly elections said Raj Thackeray news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या