21 January 2025 7:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN SIP Investment | पगारदारांनो, SIP गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याचा 'हा' फॉर्म्युला माहित आहे का, 5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

बावनकुळेंचं निवडणुका रद्द करण्यासाठी निवदेन | राज्य निवडणूक आयुक्तांचा स्पष्ट नकार

BJP Leader Chandrashekhar Bawankule

मुंबई, २५ जून | राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका रद्द कराव्यात या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक आयुक्त मदान यांची भेट घेतली. सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द केलं आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समित्यांमधील रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुका रद्द करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.

याबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटल्याशिवाय जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेऊ नका, या मागणीसाठी आम्ही यूपीएस मदान यांना भेटलो. मात्र तरीही या निवडणुका थांबणार नाही असंच सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत त्यांना निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्य आयुक्तांना या निवडणुका घेऊ नका म्हणून सांगितलं आहे. याच धर्तीवर जर महाराष्ट्र सरकार कोर्टात गेलं तर या निवडणुका थांबू शकतात. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सीताराम कुंटे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी. तरच या निवडकणुका थांबवता येतील, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

महाराष्ट्र सरकारला खरंच ओबीसींची चिंता असेल, तर निवडणुकांसंदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा. भारतीय जनता पक्षाकडून 26 जूनला चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन एका दिवसात थांबणार नाही, तर दररोज आंदोलन होत राहतील, असंही बावनकुळेंनी सांगितलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: BJP leader Chandrashekhar Bawankule meet election commissioner demands cancel ZP election till OBC reservation issue get solved news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x