23 February 2025 1:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

त्या बहिणी एकाच घरात राहतात | तिची मोठी बहीण याप्रकरणी का बोलत नाही? - चित्र वाघ

BJP leader Chitra Wagh, NCP, minister Dhananjay Munde

मुंबई, १३ जानेवारी: राज्याचे सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्याने राज्यात खळबळ उडालीय. धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी फेसबुक पोस्ट करत सविस्तर स्पष्टीकरणही दिलं आहे. मात्र त्यांच्या स्पष्टीकरणानंतर तसंच खुलाशानंतर काही सवाल उपस्थित होत आहे. “तक्रार करणारी महिला आणि धनंजय मुंडे यांच्या म्हणण्याप्रमाणे ते संबंधात असलेली महिला दोघीही एकाच घरात रहातात मात्र मोठी बहीण यावर काहीच बोलत नाही. तिची मोठी बहीण याप्रकरणी का बोलत नाही?”, असा सवाल उपस्थित करताना आपल्या छोट्या बहीणीसाठी करुणा शर्मा यांनी धावून यायला हवं, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

याचबरोबर, कितीही मोठा नेता असु द्या… दोषींना पाठीशी घालू नका.. जोपर्यंत संपूर्ण तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले पाहिजे तसंच अशा मोठ्या घटनांमध्ये पीडिता व तिच्या कुटुंबीयांवर दबाव येऊ शकतो. पुराव्यांमध्ये छेडछाड होऊ शकते, तपास कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात म्हणून धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

दरम्यान, सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या गायिकेने बलात्काराचा आरोप केला. राजकीय वर्तृळात या गोष्टीने खळबळ माजली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांच्यावरील आरोपानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. मुंडे यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक इथं भेट घेतली आहे. आज प्रत्यक्ष भेट घेत आरोपानंतर मुंडे यांनी स्वत:ची भूमिका पवारांसमोर मांडली आहे.

 

News English Summary: Social Justice Minister Dhananjay Munde has been accused of rape. Dhananjay Munde has also given a detailed explanation by posting on Facebook. However, after his explanation as well as the revelation, some questions are present. According to the complainant and Dhananjay Munde, the woman in the relationship lives in the same house but the elder sister does not talk about it. Why doesn’t her elder sister talk about it? ”, While asking the question, Karuna Sharma should come running for her younger sister, said Chitra Wagh.

News English Title: BJP leader Chitra Wagh criticised NCP after allegations on minister Dhananjay Munde news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x