22 December 2024 10:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price
x

पूजा चव्हाण प्रकरणी चित्रा वाघ आक्रमक | आता सोशल व्हायरलद्वारे चित्रा वाघ लक्ष

BJP Leader Chitra Wagh, social media, Pooja Chavan

पुणे, २६ फेब्रुवारी: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. पूजाचा मृत्यू झाला, त्या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर वाघ ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर जोरदार बरसल्या. पूजा चव्हाण हिचा मृत्यू झाला, त्या ठिकाणाला चित्रा वाघ यांनी गुरुवारी भेट दिली. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन तेथील पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन तपासाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. वाघ म्हणाल्या की, आत्महत्येचा प्रकार मध्यरात्री एकच्या सुमारास घडला. त्यानंतर त्यांनी सरकारला लाज वाटली पाहिजे असा घणाघात देखील केला होता.

त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संजय राठोड यांना पाठीशी घालणार नाहीत, असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. “मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तालमीत तयार झाले आहे, हे सांगायला मला जराही संकोच वाटत नाही. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील संपूर्ण तपशील शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचला, तर ते संजय राठोडला पाठीशी घालणार नाहीत, हे मी विश्वासाने सांगते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतही मला हा विश्वास आहे.” असे चित्रा वाघ यांनी सांगितले.

मात्र त्यानंतर चित्रा वाघ आणि महिला सुरक्षेला अनुसरून त्यांच्या संदर्भातील जुनी वृत्त समाज माध्यमांवर व्हायरल होतं आहेत. यामध्ये त्यांनी भाजपच्या काळात महिला सुरक्षित नसल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे त्यांचे पती किशोर वाघ यांना ४ लाखाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं होतं. त्या वृत्तासंबंधित व्हिडिओ देखील व्हायरल होतं आहेत.

 

News English Summary: Since then, the old news about Chitra Wagh and women’s safety has gone viral on social media. In it, he had alleged that women were not safe during the BJP regime. Her husband Kishor Wagh was caught red-handed while accepting a bribe of Rs 4 lakh. Videos related to that story are also going viral.

News English Title: BJP Leader Chitra Wagh related news viral on social media news updates.

हॅशटॅग्स

#SocialMedia(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x