उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते, राठोडांना फाडून खाल्लं असतं - चित्रा वाघ

मुंबई, २७ फेब्रुवारी: साहेब हे सगळे एकजात सारखेच आहेत. आम्हाला फक्त तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुमच्यावर कुणाचा दबाव तर नाही ना?, असं प्रश्न करत आम्ही तुम्हाला ओळखतो. तुमची वेगळी छबी आहे. तुमचं व्यक्तीमत्व सगळ्यांच्यापेक्षा वेगळं आहे. तुम्ही कारवाई कराल. या बलात्काऱ्याला हाकलून लावाल. याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कराल. आता आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे”, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
संजय राठोड बलात्कारी असून, एका बलात्काऱ्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. व्याभिचाराचं उदात्तीकरण सुरू आहे. पण, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षा आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर नसते. शिवसेनेचे पक्षप्रमुख असते, तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्लं असतं,” असं म्हणत वाघ यांनी राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
पूजा चव्हाणच्या घरात एक मोबाईल सापडला. तो लॉक होता. पण नोटिफिकेशन पॉप होत होते. त्यात संजय राठोड नावाच्या व्यक्तीचे तब्बल ४५ कॉल होते. हा संजय राठोड नेमका कोण, याचं उत्तर पुणे पोलीस देणार का, असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित केला. हा प्रश्न एकट्या पूजा चव्हाण, संजय राठोडचा नाही. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा आहे. स्वत: शेण खायचं आणि समाजाला वेठीला धरायचं असा प्रकार सुरू आहे. दहा लाख लोक जमवले, तरीही निर्दोषत्व सिद्ध होत नाही, असं वाघ म्हणाल्या.
News English Summary: Sir, they are all the same. We just expect from you. We know you by asking who is pressuring you or not? You have a different image. Your personality is different from everyone else’s. You will take action. Get rid of this rapist. You will be charged with manslaughter. Now we have expectations from you ”, demanded BJP leader Chitra Wagh to the Chief Minister Uddhav Thackeray.
News English Title: BJP leader Chitra Wagh request CM Uddhav Thackeray on Pooja Chavan Case news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC