15 November 2024 12:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
x

अण्णा हजारेंकडून आंदोलनाचा इशारा | भाजप नेत्यांकडून मनधरणी सुरु

BJP leader Girish Mahajan, Anna Hajare

राळेगणसिद्धी, २८ जानेवारी: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीला पोहचले आहेत. आज भल्या सकाळीच महाजन अण्णांच्या भेटीसाठी अण्णांच्या गावी म्हणजेच राळेगणसिद्धीत पोहोचले. याअगोदरही एकदा महाजन यांनी अण्णांची भेट घेतली होती.

आपल्या मागण्यांसाठी केंद्र सरकारविरोधात अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. मागील 2 महिन्यांपासून अगोदरच दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. अशा परिस्थितीत जर अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून अण्णांची मनधरणी करण्याचं काम सुरु आहे.

दरम्यान, अण्णा हजारे यांनी यावर तूर्त काहीही भाष्य न करता या प्रस्तावाचा सखोल अभ्यास करणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी हजारे यांनी तीन सदस्यांची समिती नियुक्त केली आहे. यामध्ये दिल्लीतील एक आणि महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. एक कृषी शास्त्रज्ञ, एक कायदेतज्ज्ञ आणि हजारे यांच्या कार्यालयातील सहकारी अशा तिघांची समिती तयार करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या प्रस्तावाचा ही समिती आज दुपारपर्यंत अभ्यास करणार आहे. त्यावर काय भूमिका घ्यावी, काय दुरुस्ती करावी याबद्दल हजारे यांना माहिती दिली जाईल. त्यानंतर हजारे दुपारी केंद्र सरकारच्या प्रस्तावाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

 

News English Summary: Bharatiya Janata Party leader and former minister Girish Mahajan has reached out to senior social activist Anna Hazare. Early this morning, Mahajan reached Anna’s village, Ralegan Siddhi, to meet Anna. Mahajan had met Anna once before.

News English Title: BJP leader Girish Mahajan meet Anna Hajare news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x