16 April 2025 4:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

अण्णांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आंदोलन करु नये | भाजप नेत्याशी अण्णांची दीडतास चर्चा

BJP leader Girish Mahajan, Anna Hajare, New agriculture laws, Farmers Protest

राळेगणसिद्धी, २४ डिसेंबर: केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना काही शेतकरी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. भारतीय किसान युनियनने सुप्रीम कोर्टात या कायद्यांच्या विरोधात याचिका दाखल केली असून सुप्रीम कोर्टासमोर प्रलंबित असलेल्या या प्रकरणाच्या सुनावणीची मागणी केली आहे. नवीन कृषी कायदे उद्योजकांच्या हितांचे रक्षण करतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे हित जपले जाणार नाही, असा दावा या याचिकेत केला आहे. हे कायदे घटनाविरोधी आणि शेतकरी विरोधी आहे.

समांतर बाजार उपलब्ध करून दिल्यामुळे शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी अस्तित्वात आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांची यंत्रणाच त्यामुळे नष्ट होईल. संपूर्ण शेतीमालाचे औद्योगिकीकरण करणाऱ्या कायद्यांमुळे शेतीमालाचे भाव उद्योजक निश्‍चित करतील, त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे, असेही या याचिकेत म्हटले आहे. एका बाजूला शेतकरी शेतकरी न्यायालयातील आणि रस्त्यावरील लढाई लढत असताना दुसरीकडे राज्यातील भाजप नेते या आंदोलनाला महाराष्ट्रातून हवा मिळू नये म्हणून धावपळ करताना दिसत आहेत.

या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांच्य मनधरणीचा प्रयत्न केल्याचे समजते. विशेष म्हणजे अण्णा देखील भाजप नेत्यांना गरजेपेक्षा अधिक वेळ देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

कारण काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. तसे पत्रही अण्णांनी केंद्र सरकारला पाठवले होते. यापूर्वी 21 तारखेला माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि खासदार भागवत कराड यांनी देखील अण्णांची भेट घेऊन मनधरणी केली होती. त्यानंतर आता गिरीश महाजनही अण्णा हजारे यांना भेटायला आले. त्यामुळे अण्णांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन न करण्यासाठी थेट केंद्रातून हालचाली सुरु असल्याचे संकेत मिळत आहेत. गिरीश महाजन यांनी आज अण्णा हजारे यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली. अण्णांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आंदोलन करु नये, अशी विनंती महाजन यांनी केली.

दरम्यान, 30 जानेवारी 2019 रोजी अण्णांनी केलेले उपोषण सोडण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गिरीश महाजनही अण्णा हजारे यांच्याकडे आले होते. यावेळी अण्णांना आश्वासन देण्यात होते. परंतु, अद्यापही अण्णांच्या मागण्या मान्य न झाल्याने अण्णांनी नव्याने आंदोलनाचा इशारा दिला. अण्णांनी केलेल्या मागण्या रास्त असून केंद्र सरकारही त्याच मार्गाने जात असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. तसेच अण्णा हजारे यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.

 

News English Summary: On the one hand, farmers are fighting in the courts and on the streets, while on the other hand, BJP leaders in the state are seen rushing to prevent the movement from getting air from Maharashtra. Against this backdrop, former minister Girish Mahajan met Anna Hazare today. It is understood that Girish Mahajan tried to seduce Anna Hazare at this time. What is special is that even Anna is giving more time to BJP leaders than necessary. Girish Mahajan had a one and a half hour discussion with Anna Hazare today. Mahajan requested that Anna should not agitate on the issue of farmers.

News English Title: BJP leader Girish Mahajan meet Anna Hajare over new agriculture laws issue news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Anna Hajare(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या