राष्ट्रवादी पंढपुरात लोटसचं ऑपरेशन करणार | किंगमेकर कल्याणराव काळे राष्ट्रवादीसाठी मैदानात?
पंढरपूर, ३ एप्रिल: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत अनेकांनी बंडाचे निशाण फडकवल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगणार असला तरी या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. सध्या ते कोणत्याच पक्षांच्या बैठकीला उपस्थित रहात नव्हते. काळे अद्यापही तटस्थ असल्याने ते कोणती राजकीय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. एकंदरीतच या निवडणुकीत कल्याणराव काळे हे ‘किंगमेकर’ ठरणार आहेत.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी स्वत: निवडणुकीला सामोरे न जाता भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या मागे आपली शक्ती उभी केली आहे. परंतु भाजप नेते कल्याणराव काळे आणि त्यांचे कार्यकर्ते निवडणूक प्रचारापासून चार हात लांब होते. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता वाढली होती.
त्यात भाजप उमेदवाराच्या विरोधात कुटुंबातीलच सदस्याने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपच्या उमेदवाराची चिंता वाढली आहे. यातच कल्याणराव काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यामुळे काळे यांच्या भूमिकेवर दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
मात्रा आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील पंढपूरच्या दौऱ्यावर आले आहेत आणि मोठ्या राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यापूर्वी कल्याणराव काळे यांनीही कार्यकर्त्यांची बैठक घेत राष्ट्रवादीचा प्रचार करण्याचे निश्चित केले आहे. आज दुपारी काळेंच्या आढीवच्या फार्म हाऊसवर जेवणाचा बेत असून तेथेच प्रचाराचा नवा प्लॅन शिजणार आहे.
मागील काही दिवसांपासुन भाजपावर नाराज असलेले कल्याण काळे निवडणूकीत कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते. काळेंनी पंढरपुरात आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली व राष्ट्रवादीचा प्रचार करण्याची भूमिका जाहीर केली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आ. संजय शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे मोठे नेते पंढरपुरात येत आहेत.
कल्याणराव काळेंच राष्ट्रवादीसोबत जाण्याच निश्चित झाल्यानंतर ते राष्ट्रवादीच्या जयंत पाटील, संजय शिंदे यांच्यासोबत आढीव फार्म हाउसवर स्नेहभोजन घेत प्रचाराचा नवा प्लॅन शिजवणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
News English Summary: The Pandharpur Assembly by-election will be a tumultuous one as many have raised the flag of rebellion. Though the NCP will play a similar match against the BJP in this election, the role of BJP leader and co-operative Shiromani Vasantrao Kale and co-operative sugar factory president Kalyanrao Kale will be crucial.
News English Title: BJP leader Kalyanrao Kale in support on NCP candidate for Pandharpur Malgalvedha by poll election news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो