27 January 2025 10:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, श्रीमंत करणारी टाटा म्युच्युअल फंडाची योजना, 1,06,81,334 रुपये परतावा दिला Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर मालामाल करणार, 54 टक्क्यांच्या तेजीचे संकेत, व्हेंचुरा ब्रोकरेज बुलिश - NSE: ADANIPOWER IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे
x

लोटसचं ऑपरेशन | भाजप नेते कल्याणराव काळे यांची राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता

BJP Leader Kalyanrao kale, NCP party, BJP Party

पंढरपूर, १८ डिसेंबर: भारतीय जनता पक्षाचे नेते कल्याण काळे (BJP Leader Kalyanrao Kale) हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. माहितीनुसार , सरकोली येथे शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात कल्याण काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित होते.

त्यामुळे कल्याण काळे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे . या कार्यक्रमात कल्याण काळे यांनी केलेल्या एका वक्तव्याचीही चांगलीच चर्चा आहे. आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करू, असे कल्याण काळे यांनी म्हटले.

पवारसाहेबांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुराडे पेटले. आमच्याही काही चुका झाल्या; परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे कल्याण काळे यांनी सांगितले.

कल्याणराव काळे यांनी 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवून 65 हजार मते मिळवली होती. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कल्याणराव काळेंनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला माढ्यासारख्या बालेकिल्ल्यातच खिंडार पडले होते.

कोण आहेत कल्याण काळे?

  • कल्याणराव काळे हे सोलापूर जिल्ह्यातील मोठं नाव आहे.
  • विधानसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले
  • भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष
  • सिताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापक
  • श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष
  • सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष
  • सोलापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष
  • राज्य सहकारी साखर संघाचे माजी उपाध्यक्ष
  • माढा, पंढरपूर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात मोठा जनाधार
  • राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, बँकिंग, आरोग्य क्षेत्रातही मोठं काम

 

News English Summary: BJP leader Kalyanrao Kale is expected to join the NCP soon. According to sources, Kalyan Kale was present on the same platform along with NCP’s Sarvesarva Sharad Pawar at the function held at Sarkoli on Friday.

News English Title: BJP Leader Kalyanrao kale may join NCP party soon news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x