गोवारी समाजाविरुद्धच्या निकालामुळे भाजप नेत्याला अत्यानंद | भाजपविरोधात रोष वाढणार?
मुंबई, १९ डिसेंबर: गोवारी समाज हा आदिवासीच नसून त्यांना अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात सामील करण्याचा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा १४ ऑगस्ट २०१८ चा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला. या आदेशामुळे गोवारी समाजाला मोठा धक्का बसला आहे. या समाजाला आता अनुसूचित जमाती प्रवर्गातर्गत लाभ घेता येणार नाही.
‘गोवारी हे आदिवासी नाहीत, असा सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल सत्य व आदिवासींच्या हक्काला न्याय देणारा आहे. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू न देणाऱ्या या निकालामुळे आपल्याला अत्यानंद झाला आहे,’ अशी प्रतिक्रिया माजी आदिवासी विकास मंत्री, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे नेते मधुकर पिचड यांनी व्यक्त केली आहे. या निकालातून इतर समाजालाही आदिवासींमध्ये घुसखोरी करता येणार नाही, हे सिद्ध होत असल्याचेही पिचड म्हणाले. यामध्ये त्यांचा रोख ओबींसीकडे आहे. मात्र भाजप नेते मधुकर पिचड यांना गोवारी समाजाविरुद्धच्या निकालामुळे झालेल्या आनंदामुळे समाजात भाजप विरोधात रोष वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, गोवारी समाजाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या कालच्या निर्णयाने गोवारी समाजात निराशा पसरली आहे तर शासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. न्यायालयाचा निर्णय येताच समाजातील २०० वर प्रमुख कार्यकर्ते व नेते शुक्रवारी गोवारी शहीद स्मारक येथे एकत्र आले. त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर चिंतन केले. यावेळी शासनाच्या विराेधातील संतापही अनेकांनी व्यक्त केला. या निर्णयाविराेधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून पुन्हा एकदा न्याय मागण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
यावेळी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत, आदिवासी गोंड गोवारी सेवा मंडळाचे सहसचिव व याचिकाकर्ते हेमराज नेवारे, गोवर्धन काळसर्पे, जयदीप राऊत, रुपेश चामलाटे, योगेश नेहारे, झेड. आर. दुधकवर प्रामुख्याने उपस्थित हाेते.
News English Summary: The Supreme Court’s ruling that Gowaris are not tribal is true and upholds the rights of tribals. We are delighted with the decision, which did not affect the reservation of tribals, “said Madhukar Pichad, former tribal development minister, national working president of the All India Tribal Development Council and leader of the Bharatiya Janata Party. The verdict also proves that other communities will not be able to infiltrate the tribals, he said. In this, their cash is with OBC. However, BJP leader Madhukar Pichad is happy with the verdict against the Gowari community, which is expected to increase anger against the BJP.
News English Title: BJP Leader Madhukar Pichad reaction after Gowari Samaj reservation result in Supreme court news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON