5 November 2024 4:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC
x

उद्धव ठाकरे व सेनेच्या बदनामीसाठी खोटा व्हिडिओ प्रचार; फडणवीस सुद्धा सामील - सविस्तर

BJP, Morphing Video, Social Media, Delhi Students Protest chants

मुंबई: नागरिकत्व दुरुस्ती कायद्या संसदेत मजूर झाल्यानंतर देशभर मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येतो आहे. ईशान्य भारतात तर उग्र स्वरूप आलेलं असताना दिल्ली विद्यापीठ देखील प्रसार माध्यमांच्या केंद्रस्थानी आहे. मात्र, याच अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीतील (एएमयू) विद्यार्थ्यांच्या संबंधित आंदोलन आणि घोषबाजीवरून १-२ व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात येत आहेत.

विशेष म्हणजे या मोहिमेत भारतीय जनता पक्षाचे अनेक मोठे नेते मंडळी उतरली असून, त्यातून भाजपच्या राजकीय अजेंड्यासंबंधित घोषणा बाजूला करून मूळ व्हिडिओचा दर्जा कमी करून आवाज आणि वास्तव शब्द स्पष्ट समजणार नाहीत याची विशेष काळजी घेतली गेल्याच फॅक्ट-चेक मध्ये समोर आलं. भाजपच्या राजकीय अजेंड्यातील ‘कट्टर हिंदुत्व, ब्राह्मणवाद, जातीयवाद आणि सध्या गाजत असलेला सावरकरांचा मुद्दा हा घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्त्यांच्या केंद्रस्थानी होता. विशेष म्हणजे हेच “व्हिडिओ मॉर्फिंग” तंत्र कन्हैया कुमारला देशद्रोही सिद्ध करण्यासाठी वापरलं होतं, मात्र न्यायालयाने दूध का दूध केलं आणि त्याला दोषमुक्त केलं.

मात्र, नागरिकत्व दुरुस्ती कायद्या संमत केल्यानंतर देशभर कायदा सुव्यवस्थेचा भडका उडू लागल्याने दिल्ली विद्यापीठातील घोषणाबाजीतील भाजपच्या राजकीय अजेंड्यासंबंधित शब्दांना थेट देशातील हिंदूंशी जोडून “हिंदुत्व” या भाजपच्या अजेंड्यातील शब्दाला थेट “हिंदू समाज” शब्दाशी जोडली आहे. म्हणजे मूळ व्हिडिओचा दर्जा कमी करून त्यातील शब्द नीट समजून येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. त्यानंतर भाजपच्या सर्व नेत्यांनी तोच व्हिडिओ समाज माध्यमांवर जोरदारपणे व्हायरल करत ट्विटर आणि फेसबुक’वर ” “हिंदुओं की कब्र खुदेगी, एएमयू की छाती पर” असे शब्द प्रयोग करून प्रक्षोभक अपप्रचार सुरु केला आहे.

वास्तविक विद्यार्थी ज्या घोषणा देत आहेत त्यात भाजपच्या अजेंड्यातील “हिंदुत्व, ब्राह्मणवाद, जातीवाद आणि सध्याचा सावरकर वाद” यावर घोषणाबाजी होते आहे. भारत, हिंदू समाज किंवा हिंदुस्थानी अशा कोणत्याही शब्दांचा प्रयोग नाही. देशातील भाजपचे विरोधी प्रमुख पक्ष नेहमीच “हिंदुत्व, ब्राह्मणवाद, जातीयवाद” हे भाजपच्या राजकीय अजेंड्यातील शब्दांवरून भाजपाला लक्ष करत आले आहेत आणि तोच भाजपचा अजेंडा दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या घोषणामध्ये होता. त्या घोषणाबाजीत विद्यार्थी भाजपच्या राजकीय अजेंड्यावरून खालील घोषणा देत होते.

हिंदुत्व की कबर खुदेगी, एएमयू की छाती पर  (भाजपच्या राजकीय अजेंड्या संबंधित)

ब्राह्मणवाद की कबर खुदेगी, एएमयू की छाती पर  (भाजपच्या राजकीय अजेंड्या संबंधित)

जातीवाद की कबर खुदेगी, एएमयू की छाती पर  (भाजपच्या राजकीय अजेंड्या संबंधित)

सावरकर की कबर खुदेगी, एएमयू की छाती पर (सध्या सावरकरांचा मुद्दा देखील पेटल्याने त्याचा देखील संबंध घोषणांमध्ये आला)

मात्र भाजपच्या नेत्यांनी कमी दर्जाचा व्हिडिओ (Reducing Quality) बनवून त्यातील आवाजाचा दर्जा सुस्पष्ट राहणार नाही याची काळजी घेत “मॉर्फिंग” व्हिडिओ पसरवला आणि हिंदुत्व शब्दां ऐवजी “हिंदुओं की कबर खुदेगी, एएमयू की छाती पर” अशी लाईन वापरून, हिंदू समाजाची माथी भडकविण्याची रणनीती आखली आहे का अशी चर्चा देखील समाज माध्यमांवर रंगली आहे.

पहिलं उदाहरण, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष संतोष रंजन राय यांनी “हिंदुओं की कब्र खुदेगी, एएमयू की छाती पर भारत” सुन्ने को मिल रहा भाई या संदेशासह व्हिडीओ पोस्ट केला (हिंदूंची कबर एएमयूच्या छातीवर खोदली जाईल. आम्ही हे भारतात ऐकण्यास मिळणार आहे, असं सांगत वातावरण तापविण्यास सुरवात केली आहे.

फॅक्ट चेक:  ट्विटरवर कीवर्डच्या मदतीने, महाराष्ट्रनामा न्यूजला तोच व्हिडिओ चांगल्या ऑडिओ आणि व्हिडिओ गुणवत्तेसह सापडला. खाली पोस्ट केलेला व्हिडिओ ऐकून हे स्पष्ट होते की विद्यार्थ्यांनी हिंदूविरोधी (हिंदू समाज) घोषणा दिल्याचा दावा खोटा आहे. ते प्रत्यक्षात भाजपच्या राजकीय अजेंड्यातील हिंदुत्व, भाजप, ब्राह्मणवाद, जातीयवाद आणि सध्याचा चर्चेतील सावरकरांविरोधात घोषणा देत होते हे स्पष्ट झालं.

विद्यार्थ्यांना “हिंदुत्व कब्र खुदेगी, एएमयू छाती पर”………“ब्राह्मणवाद कब्र खुदेगी, एएमयू की छाती पर”……“जातीवाद कब्र खुदेगी, एएमयू की छाती पर”……..“भाजपकी कब्र खुदेगी, एएमयू की छाती पर”……“सावरकर की कब्र खुदेगी, एएमयू की छाती पर”….अशा घोषणा दिल्या होत्या, ज्या भाजपच्या अजेंड्याशी संबंधित होत्या नाकी “हिंदू समाजाच्या” विरुद्ध. सदर व्हिडिओ १२ डिसेंबर २०१९ रोजी अपलोड करण्यात आला होता.

शिवाय, आम्हाला संबधित व्हिडिओचे व्हायरल व्हर्जन देखील मॅच केली आणि आम्हाला आढळले की वरील मूळ व्हिडिओच्या तुलनेत बदलण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये डीप “झूम-इन” केला गेला आहे. व्हिडिओची ऑडिओ गुणवत्ता त्यामुळे व्हायरल व्हर्जनमध्ये लक्षणीय प्रमाणवर बदलली आणि मूळ शब्द समजणे कठीण झाले आणि शेअर करणाऱ्यांनी वापरलेले शब्दच खरे वाटू लागले. तेच खोडसाळपणा केलेले व्हिडिओ भाजप नेते जोरदारपणे व्हायरल करत आहेत. त्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सामील असून त्यांच्या चतुर बुद्धीला खात्री नसल्याने त्यांनी ते शब्द कॉपी केले नाहीत, पण शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग मेंशन न करताच प्रश्नार्थक वातावरण करून बातम्या प्रसारित होतील याची काळजी घेतल्याचं दिसतं. याच मोहिमेत भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय देखील असून ते कन्हैया कुमारच्या व्हिडिओ वेळी प्रकाशझोतात आले होते.

उजवीकडील फोटोमध्ये पाहिल्याप्रमाणे, संपूर्ण गेट पार्श्वभूमीमध्ये दिसत आहे, परंतु सध्या व्हायरल असलेल्या व्हिडिओमध्ये तो नाही, ज्याचा स्क्रीनशॉट डावीकडे दिसत आहे. दरम्यान, भाजपा यूपीचे प्रवक्ते शलब मणि त्रिपाठी यांनी व्हिडिओ शेअर करताना हिंदूंच्या विरोधात घोषणा देत असल्याचा खोटा दावा करून व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्याला आतापर्यंत ९०० च्या जवळपास रिट्विट केले झालं आहे.

शिवसेनेवर हिंदुत्वावरून आरोप करून पक्षाचा राजीनामा देणारे माजी सदस्य रमेश सोलंकी यांनीही “हिंदुओं की कब्र खुदेगी, एएमयूची छाती… ..या खोट्या दाव्यासह हाच व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यानंतर भाजप दिल्लीचे प्रवक्ते तजिंदर बग्गा यांनी तीच क्लिप (डावीकडील) पोस्ट करून दुसरा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. आणि भडकाऊ शब्द प्रयोग केले आहेत.

भाजपा सोशल मीडियाचे प्रमुख अमित मालवीय यांनी बग्गा यांच्या संदेशानुसारच क्लिप (डावीकडील) ट्विट केली आहे, “एएमयूचे विद्यार्थी‘ हिंदुओचा कब्र खुदेगी, एएमयूच्या धरती पर ’हा नारा देत आहेत असं म्हटलं आहे.

तर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट मेन्शन न करता हिंदुत्वाच्या नावाने पूर्ण बदनाम कसं करता येईल याच अजेंड्यावर चालत आहेत असंच म्हणावं लागेल. याला शिवसेना कसं प्रतिउत्तर देणार ते पाहावं लागणार आहे.

दरम्यान, सदर व्हिडिओ व्हायरल करताना भाजप नेते कोणालाही टॅग-मेन्शन करत नाहीत हे विशेष. यावरून त्यांना तो केवळ जास्तीत जास्त नेटिझन्सकडे पोहोचवायचा आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यात मागील अनेक महिन्यांपासून भाजपसबंधित फेसबुक’वरील ग्रुप्स जे मृतावस्थेत होते ते अचानक कार्यरत झाल्याने मोठी योजना आखली जाणार आहे याची प्रचिती येणार आणि त्याचच हे पहिलं उदाहरण म्हणता येईल. यामध्ये शिवसेना आणि मुख्यमंत्री रडारवर असतील अशी शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना भाजपविरोधात तितकीच आक्रमकपणे न उरल्यास त्यांना त्याचे परिमाण भोगावे लागू शकतात. कारण भाजप स्वतःच्या पक्षीय अजेंड्यावरील शब्द “हिंदू समाजाच्या” माथी मारून त्यात शिवसेनेला लक्ष करत आहेत हे स्पष्ट होतं आहे.

 

Web Title:  BJP Leader Making Viral of Morphing Video on Social Media Regarding Delhi Students Protest Chants.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x