22 January 2025 1:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

भाजपमधील पक्षांतर्गत विरोधकांना जे हवं होतं, तेच पंकजांकडून घडलं? | तर त्या भविष्यात....

Pankaja Munde

बीड, १६ ऑगस्ट | मागील काही काळापासून पंकजा मुंडे यांना पक्षांतर्गत अघोषित विरोधाचा सामना करावा लागतोय हे लपून राहिलेलं नाही. त्यांनी अनेकदा तसा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रतिक्रिया दिल्या होत्या. अगदी शिवसेना सारख्या पक्षाने तर त्यांना खुली ऑफर देत शिवसेनेत येण्याचं निमंत्रण दिलं होतं. अगदी केंद्रीय मंत्री पदी खासदार बहिणीची वर्णी न लागत मराठवाड्यातील दुसरे ओबीसी नेते भागवत कराड यांना संधी दिली हा देखील त्यांना धक्का होता हे देखील सत्य असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.

दिल्लीतील भेटीनंतर त्यांनी नाराजीनाट्यावर मुंबईत शक्तिप्रदर्शन केलं आणि त्याच कारण होतं ते त्यांच्या पाठीशी उभे असलेलं कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे देखील लपून राहिलेलं नाही. पंकजा मुंडेंची शक्ती हे त्यांचे बीड-परळीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते आणि तीच भाजपच्या वरिष्ठांची अडचण होती. मात्र कालच्या घटनेनं तीच दूर झाली आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. उद्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अशा प्रकारे हटकल्याने आणि व कॅमेरा झापल्याने त्यांचा आत्मसन्मानाची दुखावला जाऊ शकतो आणि तेच भाजपातील विरोधकांच्या पथ्यावर पडेल अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. काल पंकजा मुंडेंच्या सार्थकांनी जी घोषणाबाजी केली तसे प्रकार राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांच्या बाबतीत घडले आहेत. मात्र त्या स्थितीतही त्यांनी समर्थकांना दुखावलं नाही. मात्र पंकजा मुंडे यांच्या बाबतीत अगदी उलटं घडल्याचं पाहायला मिळतंय.

झालं असं की, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रा आजपासून सुरु करण्यात आली. गोपीनाथ गडावरुन या यात्रेची सुरुवात झाली. मात्र, यात्रेपूर्वी परळीत मोठा राडा पाहायला मिळाला. भागवत कराड परळीत दाखल झाले त्यावेळी मुंडे समर्थकांनी पंकजा आणि प्रीतम मुंडे यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली. या संपूर्ण प्रकारावर पंकजा मुंडे चांगल्याच संतापल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला पंकजा मुंडे यांनी चुकीच्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलंच झापल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर आता पंकजा यांनी एका कार्यकर्त्याच्या पाठीवर झपका दिल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

केंद्रीय मंत्री भागवत कराड परळीमध्ये दाखल झाले त्यावेळी मोठ्या संख्येनं मुंडे समर्थक तिथे उपस्थित होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी पंकजा आणि प्रीतम यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी पंकजा मुंडे चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळाल्या. अंगार-भंगार घोषणा काय देताय… हे वागणं शोभतं का तुम्हाला असा प्रकार मला चालणार नाही, परत येऊ नका मला भेटायला, अशा शब्दात त्यांनी राडेबाज कार्यकर्त्यांना झापलं. इतकंच नाही तर पंकजा यांनी आपल्या एका कार्यकर्त्याच्या पाठीवर दणका दिल्याचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. पंकजा मुंडे यांनी यापूर्वीही आपल्या कार्यकर्त्यांना कडक शब्दात समज दिली आहे. पंकजा नेहमी अधिकारवाणीने आपल्या कार्यकर्त्यांना समजावत असतात. हा देखील त्याचाच एक भाग असल्याचं भाजप पदाधिकारी सांगत आहेत.

समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची लायकी काढली:
‘मी तुम्हाला असं वागायला शिकवलंय का? मूर्ख कुठले? मुंडे साहेबांवर तुमचे प्रेम आहेच, त्यामुळे ‘मुंडे साहेब अमर रहे’ या घोषणा मी रोखू शकत नाही, पण ‘अंगार, भंगार’ हे काय लावलं? हा दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम आहे का? असं वागणं अजिबात शोभत नाही. जेवढ्या मोठ्या उंचीची मी आहे तेवढी स्वत:ची लायकी ठेवा. नाही तर मला भेटायला येऊ नका..’ असे समर्थकांना सुनावून पंकजा निघून गेल्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP leader Pankaja Munde supporters may not happy with Pankaja Munde on reaction during Jan Ashirwad Yatra news updates.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x