18 October 2024 12:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर देणार मोठा परतावा, शेअरखान ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: HAL NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: NBCC Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेंदाता शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, रिपोर्टमध्ये तुफान तेजीचे संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पेनी शेअरवर होणार परिणाम - NSE: IDEA Wipro Share Price | आता नाही थांबणार, रॉकेट स्पीडने होणार कमाई, विप्रो शेअर करणार मालामाल - NSE: WIPRO IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलीश, यापूर्वी दिला 270% परतावा - NSE: IREDA Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 9 शेअर्ससाठी 'BUY रेटिंग, मिळेल 30% पर्यंत परतावा - NSE: Reliance
x

पंकजा मुंडे यांच्याविरोधात पक्षांतर्गत राजकारण तापवलं जातंय? | बैठकीत धाडसी निर्णयाची शक्यता

Pankaja Munde

मुंबई, १३ जुलै | केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या समर्थकांना पंकजा मुंडे मंगळवारी भेटणार आहेत. मुंबईतील वरळी येथील कार्यालयात पंकजा मुंडे समर्थकांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारीच त्या दिल्लीहून मुंबईला परतणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दिल्ली वारीनंतर समर्थकांची समजूत काढताना पंकजा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

105 समर्थकांनी दिले राजीनामे:
7 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत. त्यामुळे बीडमधील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असलेल्या मुंडे समर्थकांनी राजीनामे देणे सुरू केले. आतापर्यंत जवळपास 105 पदाधिकार्‍यांचे राजीनामे दिल्याने भारतीय जनता पक्षात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

मोदींनी सुद्धा राष्ट्रीय मुद्यांवरून सुनावले:
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांची बैठक घेतली. यात ११ सचिवांच्या सोशल मीडियाचा रिपोर्ट पंतप्रधान मोदींच्या हातात होता. यात २५ राष्ट्रीय मुद्दे निवडण्यात आले. कोणत्या सचिवांनी राष्ट्रीय मुद्द्यावरून मतप्रदर्शन केले याची माहिती पंतप्रधानांकडे होती.

पकंजा मुंडे यांच्यासोबतच्या बैठकीत पकंजा तुम्ही जास्त बोलता, लोकल मुद्द्यांवर खूप बोलता पण राष्ट्रीय मुद्द्यावर तुम्ही बोलताना दिसत नाही. राष्ट्रीय मुद्द्यावर तुमचे ट्विट कमी आहेत. लोकलपेक्षा राष्ट्रीय मुद्द्यांकडे जास्त लक्ष द्या असा सल्ला मोदींनी पंकजा मुंडेंना दिला. झी २४ तासने ही बातमी दिली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP leader Pankaja Munde will meet supporters in Mumbai today news updates.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x