पवारांकडून पंकजा मुंडेचं कौतुक | पवारांच्या गुगलीने भाजपाची डोकेदुखी वाढली
नाशिक, २८ ऑक्टोबर : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचं कौतुक करून 24 तास होत नाहीत तोच पवारांनीही पंकजा मुंडे यांचं कौतुक (Sharad Pawar praised Pankaja Munde) केलं आहे. पंकजा या चांगलं काम करत आहेत असं पवारांनी नाशिक मध्ये म्हटलं आहे. ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नावर बैठक असल्याने त्या पुण्यातल्या बैठकीत हजर होत्या. त्यांचं या विषयात काम आहे आणि त्या चांगलं काम करत आहेत असंही पवारांनी म्हटलं आहे. पवारांच्या या कौतुकामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
भाजपमधून एकनाथ खडसे नुकतेच राष्ट्रवादीमध्ये गेलेत. खडसे हे भाजपमध्ये नाराज होते. विधानसभेतल्या पराभवानंतर पंकजा मुंडे याही नाराज होत्या. त्यानंतर त्यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्या पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत.
पुण्यात राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक मंगळवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. या बैठकीला पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि शरद पवार होते. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे शेजारी शेजारी बसले होते. त्यांच्यात चर्चाही सुरु होती. या बैठकीत कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत यशस्वी तोडगा निघाला असून कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. साखर कारखान्यांशी दरवाढीसंदर्भातील तीन वर्षांचा करार करण्यात येईल. तसेच मुकादमांचे कमिशन १९ टक्के करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ऊसतोड कामगार संघटनांनी याबाबत समाधान व्यक्त केले असून कामगार आता कारखान्यांवर रूजू होतील.
News English Summary: BJP leader Pankaja Munde has praised NCP leader Sharad Pawar less than 24 hours ago and Pawar has also praised Pankaja Munde. Pawar has said in Nashik that Pankaja is doing a good job. She was present at the meeting in Pune as there was a meeting on the issue of sugarcane workers. Pawar has said that he has a job in this regard and he is doing a good job. This appreciation of Pawar has given impetus to the political discussion.
News English Title: BJP leader Pankaja Munde working well Sharad Pawars googly on the appreciative tweet News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम