22 December 2024 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका
x

राम शिंदे समर्थक ढोकरीकर आ. रोहित पवारांच्या गटात | नगरपरिषदेच्या निवडणुकांपूर्वी धक्का

MLA Rohit Pawar

नगर, ०९ ऑगस्ट | भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपचे संघटन सरचिटणीस प्रसाद बापूसाहेब ढोकरीकर यांनी पदत्याग केला आहे. ढोकरीकर सध्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असून आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहताना दिसतात. राम शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

पद सोडण्याचं कारण?
प्रसाद ढोकरीकर यांनी त्यांचं पद सोडण्याचं कारण सांगितलं आहे. कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणांमुळे पद सोडत असल्याचे प्रसाद ढोकरीकर यांनी सांगितले आहे. आजारपणामुळे आपल्याला जिल्ह्यात फिरता येणार नाही, असाही उल्लेख त्यांनी राजीनाम्यात केला आहे. प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे आणि इतर लोकप्रतिनिधी यांनी सहकार्य केल्याबद्दल ढोकरीकरांनी ऋण व्यक्त केले आहेत. पदाचा राजीनामा दिला असला, तरी भाजपचा सक्रिय सदस्य राहणार असल्याचंही ढोकरीकर यांनी म्हटलं आहे.

प्रसाद ढोकरीकर हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहताना दिसत आहेत. ढोकरीकर यांच्या व्यामशाळेचे उद्घाटनही रोहित पवारांच्या हस्ते करण्यात आले होते. पक्षाच्या अंतर्गत वादामुळे ढोकरीकरांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे ढोकरीकर यांची संघाशी जवळीक असून भाजपच्या दिग्गज नेत्यांशी देखील त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे येत्या नगरपरिषदेच्या निवडणुकांपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP leader Prasad Dhokarikar join NCP party news updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x