22 January 2025 1:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण | आधी महापालिकेत ठराव करा - प्रवीण दरेकर

BJP leader Praveen Darekar, Shivsena, Aurangabad, Sambhajinagar

मुंबई, ०३ जानेवारी: औरंगाबादचं शहराचं संभाजीनगर असं नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षामधील राजकारण सध्या तापलं आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसनं नामांतराला विरोध केल्यानं त्यात भर पडली असून शिवसेना व भारतीय जनता पक्षामध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला प्रशासकीय प्रक्रिया समजावून सांगितली आहे. एखादी गोष्ट जमत नसली की शिवसेना पळवाट काढते,’ असा सणसणीत टोला देखील त्यांनी लगावला आहे आहे.

तसेच औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारने उठसूट कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणे बंद केलं पाहिजे. अशा शब्दांमध्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

तसेच, कुठल्याही शहराचं नामकरण करण्यासाठी महापालिकेचा प्रस्ताव, राज्य सरकारची मंजुरी आणि मग केंद्राची मान्यता अशी प्रक्रिया आहे. औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करायच असेल, तर महापालिका तुमची आहे तिथे ठराव करा, राज्याच्या कॅबिनेटला निर्णय द्या. असं देखील प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराच्या विषयावर भाष्य केलं. “महाविकास आघाडीमध्ये नामांतरावरून कोणतेही मतभेद नाहीत. बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण किंवा अन्य कोणी महाराष्ट्रातील नेते आहेत त्यांचं औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी राजे यांच्यावरच प्रेम आणि श्रद्धा आहे. यासंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र बसून यासंदर्भात चर्चा करुन निर्णय घेतील, असेही राऊत यांनी सांगितलं. दरम्यान, औरंगाबादच्या नामकरणावरुन आता चांगलच राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येतंय.

 

News English Summary: The issue of renaming the city of Aurangabad as Sambhajinagar is currently heating up politics between the ruling and opposition parties in the state. The opposition to the renaming by the Congress in the Mahavikas Aghadi has intensified and a war of words has erupted between Shiv Sena and Bharatiya Janata Party. Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar has explained the administrative process to Shiv Sena. If there is no consensus, Shiv Sena escapes, ‘he has said.

News English Title: BJP leader Praveen Darekar criticised Shivsena over renaming Aurangabad as Sambhajinagar news updates.

हॅशटॅग्स

#PravinDarekar(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x