15 November 2024 2:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL
x

फडणवीस - शरद पवार सुद्धा राज्यभर फिरत आहेत | मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडायला वेळ नाही

BJP leader Praveen Darekar, CM Uddhav Thackeray, Marathi News LIVE, Marathi News ABP Maza

मुंबई, २ सप्टेंबर : प्रवीण दरेकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, काही अपवाध वगळता उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आहे. त्यामुळे सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. तसेच माझ्यासह माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे देखील राज्यभर फिरत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

कोकणात निसर्ग वादळाने थैमान घातले. पूर्ण कोकण उध्दवस्त झाले. पण मुख्यमंत्र्यांना तिथे जायला वेळ मिळाला नाही. सांगलीला महापूर आला, सातारा, कोल्हापूर पाण्याखाली गेले, काल परवा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हा पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर यायला तयार नाहीत, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितले. कोरोना संदर्भात मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी आम्ही सर्व नेते मंत्रालयात दाखल झालो. तर मुख्यामंत्री, मुंबईतल्या मुंबईत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर बोलत होते, असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

दरम्यान, विदर्भातली पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे, तसंच प्रशासन पूर्ण काळजी घेत आहे, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. मदतकार्य विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार स्वत: फिरत आहेत, आयुक्त माझ्या संपर्कात, असल्याचंही थोरात म्हणाले आहेत.

आम्ही पुराच्या स्थितीमध्ये जाणं योग्य नसतं, प्रशासन काम करत असतं. मुख्यमंत्री रोज १५ तास तरी काम करतात. सर्व स्थितीवर त्यांचं लक्ष असतं, ते वेळोवेळी आढावा घेतात, सतत संपर्कात असतात, असं वक्तव्य थोरात यांनी केलं आहे. पुण्यामध्ये पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू दुर्दैवी आहे, आपण हॉस्पिटल उभं केलं आहे. प्रशासन संपूर्ण काळजी घेत आहे, पण ही घटना घडायला नको होती, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

 

News English Summary: Along with me, former Chief Minister and Leader of Opposition Devendra Fadnavis and NCP President are also touring the state. However, there is no time for CM Uddhav Thackeray to get out of the house, said Praveen Darekar.

News English Title: BJP leader Praveen Darekar has criticized Chief Minister Uddhav Thackeray Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#PravinDarekar(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x