22 January 2025 6:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
x

भाजपाला धक्का | माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख भाजपाला रामराम ठोकण्याच्या तयारीत

BJP leader Sunil Deshmukh

मुंबई, १७ जून | राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भारतीय जनता पक्षाला धक्के बसत आहेत. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभव, सांगली व जळगाव महापालिकेची सत्ता हातातून निसटल्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये अस्वस्थता आहे. पुन्हा सत्ता मिळण्याची चिन्हं नसल्यानं निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये आलेले अनेक नेते व आमदार अस्वस्थ आहेत. त्यातूनच आता घरवापसी सुरू झाली आहे. सुनील देशमुख यांची घरवापसी हा भारतीय जनता पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

कारण माजी अर्थ राज्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार डॉ. सुनील देशमुख लवकरच काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यान झालेल्या चर्चेनंतर देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय झाला आहे. काँग्रेस हायकमांडने देशमुख यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला असून राहुल गांधी यांच्या वाढदिवशी मुंबईतील कार्यक्रमात ते घरवापसी करणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. भारतीय जनता पक्षानं त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी देखील सोपवली होती. २०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर अमरावती मतदारसंघातून त्यांनी कॉंग्रेसचे रावसाहेब शेखावत यांचा पराभव केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सुलभा संजय घोडके यांनी सुनील देशमुख यांचा पराभव केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: BJP leader Sunil Deshmukh will soon resigned from Party to join congress again news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x