10 January 2025 1:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Provident Fund | तुम्हाला सुद्धा 50 हजार पर्यंत पगार आहे का, तुमच्या EPF खात्यात 2.5 कोटी रुपये जमा होणार, कसे पहा Srestha Finvest Share Price | 75 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, जोरदार खरेदी, अप्पर सर्किट हिट करतोय - Penny Stocks List IREDA Share Price | पीएसयू IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की SELL, तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: IREDA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मिळेल मजबूत परतावा - IPO Watch Flipkart Sale 2025 | नव्या वर्षाच्या फ्लिपकार्ट सेलची तारीख जाहीर; लॅपटॉप, स्मार्टफोन आणि नवनवीन वस्तूंवर मिळणार बंपर डिस्काउंट Smart Investment | नुकतेच नोकरीला लागला असाल तर करा हे एक काम; कोटींच्या घरात पैसे कमवाल, जाणून घ्या सविस्तर माहिती Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
x

महाविकास आघाडीकडून लोटसचं ऑपरेशन सुरु असल्याने भाजप नेत्यांकडून पुन्हा पुड्या - सविस्तर वृत्त

BJP leaders, Operation Lotus, MahaVikas Aghadi

मुंबई, ०७ फेब्रुवारी: आम्ही कोणतीही शिडी न वापरता फासे पलटू शकतो’ असे विधान एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने विधानसभाध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने ‘ऑपरेशन कमळ’ होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे खासदार नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी रविवारी सिंधुदुर्गात आहेत.

अमित शहा यांच्या पायगुणाने महाविकास आघाडी सरकार पडावे, असे विधान राणे यांनी शनिवारी केले. मात्र, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मजबुतीने एकत्र आहेत आणि अध्यक्षपदाची निवडणूक अगदी सोपी असल्याचे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत म्हणाले की, फासे सगळ्यांनाच टाकता येतात. फडणवीस यांनी वर्षभर बरेच फासे टाकून पाहिले पण सरकार स्थिर आहे. त्यांचे फासे गुळगुळीत झाले आहेत.

काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचा अधिकार, पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही यासाठी सावधान राहावे लागेल, असे शिवसेनेनं म्हटले आहे. विधानसभा अध्यक्षपदाचे काय करावे यावर तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, या शरद पवार यांच्या वक्तव्याची आठवणही मुखपत्रात करून देण्यात आली आहे.

वास्तविक आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे अनेक माजी आमदार आणि नगरसेवक महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यात अनेकांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. दरम्यान, राज्यपालांकडे मोठी यादी प्रतीक्षेत आहे आणि ती निकाली लागल्यावर अनेक विद्यमान आणि माजी आमदार भाजप सोडणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे.

इतर राज्यांमध्ये भाजपाला ऑपरेशन लोटस जितकं सोपं होतं, अगदी त्याच्या उलट स्थिती महाराष्ट्रात आहे. कारण महाविकास आघाडीतील तीनही पक्ष हे अनुभवी आणि आक्रमक पदाधिकाऱ्यांची फौज असलेले आहेत. राज्यात सत्ता सत्ता स्थापनेवेळी भाजपने हरियाणात लपवलेले आमदार शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कसे उचलून आणले होते ते भाजपाला चांगलंच ठाऊक आहे. त्यात भाजपचे मागील मंत्री पदाचे उमेदवार विनोद तावडे, बावनकुळे, प्रकाश मेहता आणि पंकजा मुंडे यांची राजकीय अवस्था काय केली आहे हे सर्वासमोर असताना कोणता इतर पक्षातील आमदार भाजपमध्ये जाऊन राजकीय आत्महत्या करेल असा प्रश्न निर्माण होतो.

त्यात भाजप मध्ये गेल्यावर तिन्ही पक्षविरोधात पुन्हा निवडून येणं अशक्य असल्याने कोणताही विद्यमान आमदार स्वतःच्या आमदारकीचा बळी देणार नाही. हे सर्व भाजपच्या नेत्यांना चांगलं ठाऊक आहे. जे सुरुवातीला सत्तास्थापनेच्या वेळी भाजपाला शक्य झालं नाही ते आता होईल असं म्हणणं म्हणजे राजकारण कळत नाही असा अर्थ लागतो. त्यामुळे ५ वर्ष आपल्या लोकांना सत्तेशिवाय कसं थांबवायचं हेच खरं ऑपरेशन भाजपच्या नेत्यांना करावं लागणार आहे.

 

News English Summary: Devendra Fadnavis’s statement in a program that we can turn the dice without using any ladder has started a discussion on whether there will be ‘Operation Lotus’ on the occasion of Assembly elections. Union Home Minister Amit Shah is in Sindhudurg on Sunday for the inauguration of MP Narayan Rane’s medical college.

News English Title: BJP leaders again started spreading operation Lotus in Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x