ठाकरे सरकारविरुद्ध धार्मिक मुद्दे कायम | भाजपकडून अजून एक मागणी
मुंबई, १६ ऑक्टोबर : भाविकांना दर्शनासाठी मंदिरं खुली करावीत या मागणीसाठी भाजपतर्फे राज्यभरात घंटा नाद आंदोलन करण्यात आली होती. पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, बीडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मंदिर उघडण्याची मागणी करत घंटानाद आंदोलन केलं होतं. त्यावेळी‘दार उघड, उद्धवा दार उघड’ची जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली होती. राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी नाही. मात्र, भाजपने मंदिरं सुरु करण्याची मागणी लावून धरली होती.
लॉकडाऊन शिथील करण्याच्या प्रक्रियेत राज्यभरात दारुच्या दुकानांना अधिकृत परवानग्या देण्यात आल्या. मात्र मंदिरांचं टाळं काही उघडलं नाही, असा आरोप भाजपने केला होता. या आंदोलनात भाजपसह विश्व हिंदू परिषदही सहभागी होती. अखिल भारतीय संत समिती, अखिल भारतीय वारकरी मंडळ, वारकरी महामंडळ, अखिल भारतीय पुरोहित संघ, जय बाबाजी भक्त परिवार यांसह वारकरी, महानुभाव, लिंगायत, जैन, शीख संप्रदायाच्या अनेक संप्रदायांची प्रमुख मंदिरे, गुरुद्वारा, जैन मंदिरे-स्थानक, बौद्ध विहार यांच्या प्रवेशद्वारांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आली होती.
त्यानंतर आता भाजपनं रामलीला आयोजनाच्या परवानगीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. राज्यातील मदरसे बंद करण्याच्या मागणी करणारे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आता रामलीला आयोजनास परवानगी देण्याची मागणी केली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.
Maharashtra: BJP MLA Ram Kadam writes to Chief Minister Uddhav Thackeray seeking permission to celebrate Ram Leela across the state
— ANI (@ANI) October 16, 2020
रामलीला आयोजनास मुभा देण्याची मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. ‘राज्यात रामलीलेची मोठी परंपरा आहे. कोरोना काळात रामलीला अतिशय सहज आयोजित केली जाऊ शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंदिरं खुली करण्यास परवानगी दिली नाही. मग आता किमान रामलीला आयोजनास तरी परवानगी द्यावी,’ असं भातखळकर म्हणाले.
हिंदुत्ववादी व रामभक्त म्हणवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी बार, रेस्टॉरंट, मॉल व मेट्रोला सुद्धा परवानगी दिली,परंतु मंदिरे अद्याप बंद आहेत.
आता किमान संपूर्ण राज्यातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या घटस्थापना आणि रामलीला उत्सवाला आवश्यक नियमांसह परवानगी द्या. @OfficeofUT pic.twitter.com/3DXNI0c5SG— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 16, 2020
भातळखकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाची आठवण करून दिली. ‘उद्धव ठाकरेंनी किमान बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व लक्षात ठेवायला हवं. बाळासाहेब आज जिवंत असते, तर त्यांनी सर्वप्रथम मंदिरं खुली केली असती आणि त्यानंतर बार, रेस्टॉरंट आणि हॉटेल उघडली असती,’ असं भातखळकर यांनी म्हटलं.
News English Summary: BJP has written a letter to Chief Minister Uddhav Thackeray seeking permission to organize Ramli. BJP MLA Atul Bhatkhalkar, who has demanded closure of madrassas in the state, has now demanded permission for Ramli to organize. BJP MLA Ram Kadam has written a letter to the Chief Minister in this regard.
News English Title: BJP leaders writes to CM Uddhav Thackeray over celebrating Ramleela Shivsena hits back News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो