छत्रपतींच्या आशीर्वादाने राज्यात शिरकाव करत भाजपने मोदीं'चाच 'राजकीय' राज्याभिषेक केला?

सातारा: दिल्लीतील भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहिले आहे. भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.
वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांची धूळ बनण्याची देखील लायकी नसलेले राजकरणी, आज त्यांच्या नावाचा वापर करून स्वतःचे राजकीय अजेंडे राबवत असल्याने अनेक शिवप्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत. रयतेच्या भल्यासाठी आयुष्य खर्ची घालवणारे आणि महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रचार केला होता. ‘शिवछत्रपतीका आशीर्वाद चलो चले मोदी के साथ’ असं प्रचार करून भाजपने स्वतःची राजकीय पोळी भाजली आणि आज त्याच मोदींचा राजकीय हेतूने अघोषित राज्याभिषेक करून राजकारणाची सर्वोच्च पातळी गाठली आहे असंच म्हणावं लागेल.
भाजपमध्ये एखाद्या विषयाने डोकं वर काढलं की त्यामागे भविष्यातील हेतूने मोठी राजकीय खेळी असते आणि त्यासाठीच त्यांचा ‘थिंक टॅंक’ नियोजनबद्ध काम करत असतो. यापूर्वी देखील उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर भाजप नेत्यांनी वारंवार मोदींची तुलना थेट महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. यासाठीच भाजपचा थिंक टॅंक काम करत असतो आणि त्यासाठी पक्षातून नियोजनबद्ध काही नेत्यांमार्फत पेरणी केली जाते. अशी पुस्तकं प्रकाशित करण्यापूर्वी मोदी-शहांना कल्पना नसणार हे निव्वळ अशक्य आहे. मात्र तोच रणनीतीचा भाग असतो. मराठयांच्या नावाने राजकरण करत, प्रथम राज्यातील कोल्हापूर आणि साताऱ्यातील छत्रपती घराण्याचे वंशज भाजपात आणले आणि भविष्यात उद्भवणारा अंतर्गत वाद आधीच क्षमविण्याची रणनीती आखली असावी असं राजकीय तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे. त्यानंतरच संबंधित पुस्तक प्रकाशित करून भविष्यातील हिंदुत्वाची पुढची रणनीती सूर केल्याचं म्हटलं जातं आहे. ज्याचा पुढचा अध्याय राम मंदिराच्या उदघाटनानंतर समोर येईल. मात्र राज्यातील महाराजांच्या वंशजांची या विषयावरून झालेली अवस्था भाजप ‘थिंक टॅंक’च्या रणनीतीचा विजय मानावा लागेल. कारण तसं असतं तर आज खासदार संभाजी राजे, उदयराजे आणि शिवेंद्रराजे यांनी भाजपचा त्याग करत कणखर भूमिका घेतली असती, पण तसं झालं नाही.
दरम्यान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तक प्रकाशनाचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्यात यावरून ट्विटर वॉर पाहायला मिळाले आहे. भारतीय जनता पक्षात शिरलेल्या छत्रपतीच्या वंशजांना ही तुलना मान्य आहे का?, असा सवाल करणाऱ्या संजय राऊत यांना छत्रपती संभाजी राजे यांनी तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिले आहे.
सातारा गादीचे वारसदार श्रीमंत ऊदयन राजे श्रीमंत शिवेंद्रराजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का?
शिवरायांचया वंशजांनो बोला..
काहीतरी बोला.. pic.twitter.com/FVZEOIkn8v— Sanjay Raut (@rautsanjay61) January 12, 2020
त्यावर राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी देखील याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घालण्यास देखील सांगितले आहे. त्यांची मुजोरी सहन केली जाणार नसल्याचा इशारा देखील खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी ट्विटद्वारे दिला आहे.
उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घरण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंती, सिंदखेड राजा मध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही.@OfficeofUT @AUThackeray @ShivSena
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 12, 2020
तत्पूर्वी जिजाऊ जयंती दिनी सिंदखेड राजा येथे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भाजपाला नेमकं प्रत्युत्तर दिलं ते देखील समोर आलं आहे. त्यामुळे साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले जरी भाजपमध्ये असल्याने शांत असले तरी कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मात्र रोखठोक भूमिका घेतल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. मात्र, भाजपच्या कृत्यावर महाराष्ट्र संतापलेला असताना साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले मूग गिळून शांत बसल्याने आश्चर्य देखील व्यक्त करण्यात येतं आहे.
Web Title: BJP Made Politics over Chhatrapati Shivaji Maharaj in Maharashtra during 2014 Election.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल