14 January 2025 1:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

ED प्रमाणे NIA चौकशीतील माहिती सुद्धा भाजपाकडे प्रथम येते? | भाजपचे ट्विट दावे

Sachin Vaze, BJP, Shivsena

मुंबई, १५ मार्च: अँटिलिया व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अडकलेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे आता महाविकास आघाडी सरकारसाठी ओझे बनले आहेत. वाझेंच्या अटकेने शिवसेना-काँग्रेसला चिंता वाटते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अडचणींच्या प्रश्नावर मौन बाळगणे पसंत करीत आहेत.

आघाडी सरकारचे कर्तेकरविते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी बारामती येथे होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रीय विषयांवर भाकिते व्यक्त केली, मात्र वाझे प्रकरणावर प्रतिक्रिया विचारताच तो ‘स्थानिक’ असल्याचे सांगून पवारांनी भाष्य करणे टाळले. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी वाझे प्रकरण आघाडी सरकारसाठी ‘शुभसंकेत’ नसल्याचे म्हटले आहे, तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही वाझे यांचे प्रकरण काळजी करण्यासारखे आहे, असे मत व्यक्त केले.

सचिन वाझेंना अटक झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र सरकारने सचिन वाझे यांना सातत्याने वाचविण्याचा प्रयत्न केला. सरकारने त्यांची एकप्रकारे वकिली केली. हे प्रकरण अतिशय गंभीर असून ‘एनआयए’ला तपासादरम्यान अनेक पुरावे मिळाले असून आणखी बरीच माहिती समोर येईलच, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. याचदरम्यान भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देखील आता मोठा दावा करण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रच्या अधिकृत ट्विटरवर, सचिन वाझेंनी चौकशीत कुठल्या शिवसेना नेत्यांची नावं घेतली, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच मी तर यातला छोटासा हिस्सा आहे. यामध्ये काही शिवसेनेच्या नेत्यांचा सहभाग असल्याची कबुली सचिन वाझेंनी एनआयएकडे दिल्याचा दावादेखील भारतीय जनता पक्षाने केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या या दाव्यानंतर राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

जर NIA कोणतीही जाहीर पत्रकार परिषद किंवा परिपत्रक काढत नसताना तसेच समाज माध्यमांवर यासंदर्भात कोणतही भाष्य त्यांच्या अधिकृत हॅण्डलवरून होत नसताना आत काय घडलं याबद्दल भाजप दावे करताना दिसतंय. त्यामुळे पुन्हा वेगळी शंका व्यक्त केली जाऊ शकते.

 

News English Summary: On the official Twitter account of the Bharatiya Janata Party (BJP) in Maharashtra, a question has been raised as to which Shiv Sena leaders Sachin Waze named in the probe. Also, I am a small part of it. The BJP has also claimed that Sachin Waze confessed to the NIA that some Shiv Sena leaders were involved in this.

News English Title: BJP made serious allegations against Shivsena through State BJP tweeter handle news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x