22 April 2025 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | 4 रुपयांचा शेअर 101 रुपयांवर आला, जबरदस्त तेजीत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 2 रुपये 66 पैसे, पेनी स्टॉक जबरदस्त तेजीत, टार्गेट नोट करा - NSE: VIKASLIFE Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, चॉईस ब्रोकिंग फर्मने दिली अपडेट - NSE: SUZLON Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
x

शिवसेनेशी युती झाली तरी मुख्यमंत्री फक्त भाजपाचाच असेल; बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly Election 2019, Amit Shah, Devendra Fadnavis

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर सखोल चर्चा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि मित्रपक्षांशी युती होईलच पण मुख्यमंत्रीपदासाठी भाजपा आग्रही राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीर मुनगुंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते हजर होते. या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपा ज्या जागांवर लढतंय तिथे आणि मित्रपक्षांच्या जागेवरही जिंकण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, लोकसभा निवडणुकीत ज्याप्रकारे लोकांनी भाजपावर, महायुतीवर, नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखविला तसाच विश्वास विधानसभा निवडणुकीत दाखवतील असा विश्वास आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा रोडमॅप तयार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या