15 November 2024 4:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा
x

भाजपवर शिवसेनेच्या दबावाखाली काम करण्याची वेळ: सविस्तर

BJP, Shivsena, Maharashtra Vidhansabha Election 2019

मुंबई: २०१४ च्या विधानसभेत स्वबळावर लढून आलेल्या १२२ जागांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार शिवसेनेला सोबत घेऊन पाच वर्षे तारून नेले. मात्र या विधानसभा निवडणुकीत १००च्या आसपास जागा आल्यामुळे ते विधानसभेतील बहुमतांच्या १४५ या आकड्यापासून बरेच दूर राहिल्यामुळे शिवसेनेच्या अटी व शर्तीवर त्यांच्यावर सरकार चालविण्याचे वेळ आली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेच्या दबावाला तोंड देत सरकार चालविणे हाच मुख्य अजेंडा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आहे.

पुन्हा एकदा आपलंच सरकार… असं सांगत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २२०च्यावर आम्ही जाणार, असे छातीठोकपणे सांगणार्‍या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीचे सरकार येणार, हे आता निश्चित झाले आहे. मात्र, खरी गंमत आता पुढे आहे. भाजप १०४ जागांवर अडखळल्यामुळे पाच वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि महत्वाची मंत्रीपदे आपल्याकडेच, हे भाजपने रंगवलेले स्वप्न आता साकार होणार नाही. नव्या सरकारमध्ये शिवसेना किंगमेकर ठरणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी लागला. भाजप आणि शिवसेनेच्या बाजूने निकाल यायला सुरुवात झाल्यानंतर युतीच्या समर्थकांनी दिवाळीआधी फटाके फोडायला सुरुवात केली.

युती २०० पार करेल असे वाटत असताना हळूहळू राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे १०० उमेदवार जिंकून यायला सुरूवात झाली आणि सत्ताधार्‍यांच्या गोटात एकच शांतता झाली. बहुमतासाठी १४५ आमदारांची आवश्यकता असून दोघांना १६० जागा मिळाल्याने पुन्हा युतीचेच सरकार येणार हे अधोरेखित आहे. रात्री उशीरापर्यंत मित्रपक्षांसह १६४ जागा लढवून भारतीय जनता पक्षाच्या हाती १०४ जागा लागल्या. तर १२४ जागा लढवणार्‍या शिवसेनेला जेमतेम ५६ जागा मिळाल्या. भारतीय जनता पक्ष १२२ आमदारांवरून १०४ जागांवर तर शिवसेना ६३ वरून ५६वर घसरली आहे. मनसेने यावेळी खाते उघडले असून वंचित आघाडीने मात्र भोपळा फोडला नाही. बहुजन विकास आघाडीला ३ एमआयएमला २ जागा तर बंडखोर असे २३ उमेदवार निवडून आले.

शिवसेनेने पाच वर्षांपूर्वी ६३ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला यावेळी ५६ जागांवर समाधान मानावे लागले. एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्ष १२२ च्या पार जाणार आणि शिवसेना ८० जागा मिळणार असे सांगितले जात होते आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस २०१४ चा आकडाही गाठणार नाही, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र या अंदाजाचा बार फुसका निघाल्याने विरोधक सन्मानाने उभारताना दिसला. शरद पवार यांच्या करिष्म्याची जादू दिसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने जागांचे अर्धशतक पार करताना ५4 उमेदवार निवडून आणले. तर निवडणुकीच्या रणधुमाळीत फारसा आवाज न दिसलेल्या काँग्रेसने ४5 जागा जिंकून सर्वांना मोठा धक्का दिला. राज ठाकरे यांच्या मनसेने खाते उघडताना एक जागा जिंकली. कल्याण पश्चिममधून प्रमोद उर्फ राजू पाटील हे जिंकून आले.

भारतीय जनता पक्षाने १००च्या आसपास जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेशिवाय १४५चा बहुमताचा आकडा भारतीय जनता पक्षाला गाठता येणार नाही. त्यामुळे यावेळच्या सरकारमध्ये शिवसेनेला कमालीचे महत्त्व आले आहे. त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. सत्तेचा समान वाटा हा शिवसेनेचा प्रस्ताव असेल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सत्तेचा ५० टक्के वाटा शिवसेनेने मागितला तर तो देताना मुख्यमंत्र्यांना आपले राजकीय चातुर्य वापरावे लागेल. त्यामुळे दुसऱ्या टर्मचे हे सरकार चालविताना मुख्यमंत्र्यांना कसरत करावी लागेल. काही महत्वाची खातीही शिवसेनेला द्यावी लागतील.

दुसरीकडे २०१४ च्या विधानसभेत काँग्रेस राष्ट्रवादी या विरोधकांची संख्या ८३ होती. परंतु आता काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासह घटकपक्षांसह विरोधकांचा आकडा ११० च्या आसपास पोचला आहे. या विरोधकांची ताकद वाढली आहे. तसेच भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीला टक्कर देवून या जागा निवडून आल्यामुळे ते यावेळी अधिक आक्रमक असतील. मागील सरकारमध्ये काहींना सरकारी यंत्रणांचा धाक दाखवून काहींची कामे करून, तर काहींना पक्षात घेऊन फडणवीस यांनी विरोधकांना कमकुवत केले होते. मात्र त्यांना विरोधकांना तोंड द्यावे लागेल.

मागील निवडणुकीत १२२ जागा निवडून आल्या होत्या. त्यापेक्षा खूपच कमी जागा आल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची मर्जी कशी राहते, हे फडणवीस यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यांचे पक्षांतर्गत विरोधक एकवटू शकतात. भारतीय जनता पक्षामधील त्यांच्या विरोधातील नेत्यांचा पत्ता त्यांनी साफ केला आहे. परंतु केंद्रीय नेतृत्व फडणवीस यांच्याविरोधात कोणाला बळ देते का, यावर नजर ठेवावी लागेल.

भारतीय जनता पक्षाचा आकडा कमी झाल्याने शिवसेनेच्या आवाजाला नवी धार चढू लागली आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सत्तेत समान वाटा मिळाला पाहिजे आणि ‘आमचं ठरलंय’, या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. पुढच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, असे वक्तव्य राऊत यांनी यंदाच्या दसरा मेळाव्यात केले होते. त्याचे स्मरणही राऊत पुन्हा करून देत आहेत. त्यामुळेच पुन्हा सत्ता युतीचीच असेल हे स्पष्ट असले तरी सत्तेचे सूत्र मात्र मोठ्या प्रमाणात बदलणार आहे, असे संकेत मिळत असून त्यादृष्टीने दोन्ही पक्षांत खल सुरू झाला आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x