ऑपरेशन लोटस 'एक दंतकथा'; राज्य भाजप फुटणार असल्याने आधीच पेरणी? सविस्तर
मुंबई: राज्यातल्या महाविकास आघाडीला सत्तेवर येऊन आता ३ महिने होणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली. तीन वेग वेगळ्या विचारांचे पक्ष सत्तेत आल्याने अगदी पहिल्या दिवसांपासूनच या पक्षांमध्ये कुरबुरी सुरू असल्याचं पुढे आलंय. दरम्यान, सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी CAA कायद्याचं समर्थन केल्याने काँग्रेस नाराज असल्याचं वृत्त आहे.
काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये CAA विरोधी ठराव मंजूर झाले आहेत तर महाराष्ट्रात वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष एकत्र असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचाच फायदा घेत भारतीय जनता पक्ष ठाकरे सरकारविरुद्ध व्ह्युरचना आखत असून राज्य सरकारला धक्का देण्यासाठी तयारी करत आहे अशी वृत्त पसरली आहेत. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमुळे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ सध्या दिल्लीत व्यस्त आहेत. त्यामुळे दिल्ली निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ सुरू होणार असल्याची माहिती पुढे आल्याने सर्वत्र चर्चा रंगवली जाऊ लागली आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये गैरसमज निर्माण करण्याऱ्या बातम्या भाजपचे धुरंदर करत असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.
महाविकास आघाडी पडणार नसून कारण दुसरंच असल्याचं समोर आलं आहे. झारखंड निवडणुकीनंतर दिल्लीत देखील केजरीवाल सरकारसमोर मोदी-शहा सहित संपूर्ण भाजप तोंडघशी पडणार असल्याचे सर्व्हे आधीच प्रसिद्ध झाले असून पराभवाची मालिका सुरूच राहणार आहे. त्यामुळे मोदी-शहा देखील भाजपाचे प्रभाव टाळू शकणार नाहीत असं वातावरण निर्माण होऊ लागलं आहे. त्यात महाराष्ट्रासारखं महत्वाचं राज्य गेल्याने देशातील राजकारणच हातातून गेल्याची चर्चा भाजपात सुरु आहे. त्यात महाराष्ट्रात सरकार स्थापन करणं शक्य नसल्यानेच फडणवीस यांनी स्वतःसाठी दिल्लीत फिल्डिंग लावून भविष्यातील संकेत दिले आहेत. देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी फडणवीसांना अर्थमंत्रीपद दिलं गेलं आहे असं म्हणणं म्हणजे राष्ट्रीय विनोद समजावा लागेल. कारण काही भाजपच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना याच पदाच्या जोरावर राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांशी भविष्यात संपर्क साधून काही मांडणी करता येईल असं सांगितलं. त्यामुळे फडणवीसांची दिल्लीवारी वेगळ्याच राजकीय उद्देशानं आहे याची बाहेर चुणूक लागली आहे.
मात्र दिल्लीतील निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपचे मोठे नेते पक्ष सोडण्याची शक्यता असल्याने त्यांना थोपवण्यासाठी तसेच पक्षात थांबवण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते ऑपरेशन लोटस’च्या बातम्या पेरत असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. राज्यात मंत्रिपद, महामंडळं, जिल्हा परिषदा आणि प्रमुख सरकारी आस्थापन असं काहीच हातात न राहिल्याने पदाधिकारी देखील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं वृत्त आहे. आजच्या घडीला शिवसेना असो किंवा राष्टवादी, यातील कोणत्याही पक्षासोबत गेल्यास भाजपचीच कोंडी होणार असल्याने दिल्लीश्वर देखील त्यात उत्सुक नाहीत.
त्यात सत्तेसाठी नाराज आमदारांची फोडाफोडी करून बहुमताचा आकडा गाठणं कठीण आहे. राज्यात मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाण्याची सध्यातरी कोणाची मनःस्थिती नाही. मग पर्याय उरतो तो एकतर शिवसेनेला सोबत घेण्याचा किंवा राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी करण्याचा. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेला पुन्हा चुचकरण्यासाठी केंद्रीय नेतृत्व बिलकुल राजी नाही. तर राष्ट्रवादीसोबत जाण्यास प्रदेश भाजपमध्ये तीव्र मतभेद आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, भाजपाची लाट ओसरली असून त्यांच्यातील अनेक माजी मंत्री राष्ट्रवादी, शिवसेनेत येण्यात इच्छुक आहेत. येत्या आठवडाभरात मोठे फेरबदल झाल्याचा पाहायला मिळतील असा दावा त्यांनी केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तापालट होईल अशी बातमी पेरली जात आहे. महाराष्ट्राचे नेते दिल्लीत प्रचार करत आहे मात्र त्यांची बोट महाराष्ट्रातच बुडणार असं नवाब मलिकांनी सांगितले आहे.
Web Title: BJP mission lotus in Maharashtra Politics after Delhi Elections 2020.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो