22 January 2025 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

अडाणीपणाचा कळस | वेबसाईट मालकांच्या नियंत्रणात नसणाऱ्या गुगल ऍडसेन्स जाहिरातींवरून सेनेवर धार्मिक टीका

MLA Atul Bhatkhalkar

मुंबई, २५ मे | भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांना भाजपने मुंबईची जवाबदारी दिल्याने ते भलतेच जोश मध्ये आले असून दिवसभर वायफळ ट्विट आणि व्हिडिओ रेकोरिंग करून ट्विट करत बसणं हा त्यांचा उद्योग झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे अतुल भातखळकरांवर शिवसेना धार्मिक दृष्ट्या लक्ष करून, शिवसेनेला हिंदुत्वपासून वेगळं करणं हेच लक्ष दिलं आहे का असा प्रश्न त्यांच्या मागील ट्विटचा इतिहास पाहिल्यावर उपस्थित होऊ लागला आहे. मात्र ते इतकं सहज आहे का याची त्यांना देखील खात्री नसावी.

मात्र शिवसेनेला धार्मिक दृष्ट्या लक्ष करण्याच्या नादात आमदार अतुल भातखळकर यांचा अडाणीपणा समाज माध्यमांवर उघड होऊ लागला आहे. मागे देखील त्यांनी असे प्रकार केले आहेत. आता पुन्हा शिवसेनेला धर्मावरून लक्ष करताना त्यांनी आधार घेतला आहे तो सामनाच्या वेबसाईटवरील जाहिरातीचा आणि त्यातही ते तोंडघशी पडले आहेत असंच म्हणावं लागेल.

अतुल भातखळकर यांनी सामना वेबसाईटचा एक स्क्रिनशॉट आणि त्यावरील जाहिरातीचा फोटो ट्विट करताना म्हटलं आहे आहे की, “शिवसेनेने आता हिंदूंच्या धर्मांतराच्या जाहिराती सामनातून झळकवल्यानंतर आता हिंदुत्ववादी असल्याचे पोकळ दावे करणे बंद करावे. वास्तविक त्यांच्या या दाव्यापूर्वी त्यांनी कमीतकमी भाजपच्या IT सेलच्या तज्ज्ञांचा तरी सल्ला घ्यायला हवा होता.

कारण अतुल भातखळकर यांनी सामना वेबसाईटवरील धर्मांतराच्या जाहिराती दाखवल्या मात्र ती थेट जाहिराती नसून ती ‘Google Adsense’ म्हणजे प्रोग्रामॅटिक जाहिरात आहे. अशा डिजिटल प्रोग्रामॅटिक जाहिरातींवर कोणत्याही वेबसाईट मालकांचं नियंत्रण नसतं. त्या रॅन्डमली डिस्प्ले होत असतात. त्यातही जर तुम्ही क्रोमचा ब्राउझर वापरत असाल तर तुम्ही तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर कोणत्या वेबसाईट किंवा कंटेण्टला दिवसभरात भेट दिली ते क्रोम ट्रेस करतो आणि त्यानंतर तुम्ही एखाद्या वेबसाईटला भेट दिल्यास google तुम्हाला त्याच जाहिराती दाखवतो ज्या तुम्ही काही वेळापासून सर्च करत होता. त्यामुळे शिवसेनेला लक्ष करण्यासाठी आमदार अतुल भातखळकर हेच अशा प्रकारचे कन्टेन्ट सर्च इंजिनवर शोधत असावेत, परिणामी त्यांनी जेव्हा सामना वेबसाईटला भेट दिली तेव्हा तशाच प्रकारच्या जाहिराती ऑटोमॅटिकली दिसू लागल्या असाव्यात. त्यामुळे अतुल भातखालकरांचा तंत्रज्ञानातील अडाणीपणा उघड झाला आहे.

 

News English Summary: Atul Bhatkhalkar tweeted a screenshot of the Saamana website and a photo of the advertisement on it, saying, “The Shiv Sena should stop making hollow claims of being pro-Hindu now that Hindu conversion advertisements have flashed through the match.

News English Title: BJP MLA Atul Bhatkhal showcase Saamana website Google Adsense programmatic ads for religious attack on Shivsena news updates.

हॅशटॅग्स

#AtulBhatkhalkar(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x