27 April 2025 3:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI च्या या फंडात डोळे झाकून गुंतवणूक करा, 5 पटींनी पैसा वाढवा, सविस्तर जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार Suzlon Share Price | सुझलॉन शेअर फोकसमध्ये; 6 महिन्यात 18% घसरला, आता अपडेट खुश करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | मजबूत परतावा देणारा शेयर; टाटा स्टील शेअरची पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL NTPC Share Price | एनटीपीसी शेअर पुन्हा मालामाल करणार, यापूर्वी 464% परतावा दिला - NSE: NTPC Horoscope Today | 27 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

भातखळकरांचं अतुलनीय ट्विट | लस उत्पादनावरून मोदींना मानाचा मुजरा | प्रतिदिन ४ हजार मृत्यूंचा विसर?

India corona pandemic

मुंबई, १३ मे | देशात कोरोना रुग्णांमध्ये मागील 24 तासात पुन्हा वाढ झाली. बुधवारी 3 लाख 62 हजार 389 नवीन रुग्ण सापडले, तर 3 लाख 51 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, बुधवारी 4,127 रुग्णांचा मृत्यू झाला. चार हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. देशात या महामारीच्या विळख्यात आतापर्यंत 2.37 कोटी लोक आले आहेत. यातील, 1.97 कोटी रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील काही दिवसांपासून सरासरी 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण रिकव्हर होत आहेत.

दरम्यान, देशाची एकूण लोकसंख्या आहे १२५ कोटी आणि आजच्या घडीला प्रतिदिन ४ हजाराहून अधिक लोकं कोरोनाने मृत्युमुखी पडत आहेत. विशेष म्हणजे वॉशिंग्टन विद्यापीठाने वर्तविलेल्या अंदाजानुसार हा आकडा लवकरच ५ हजारांचा टप्पा गाठेल. प्रतिदिन ५ हजार म्हणजे प्रतिमहिना १ लाख ५० हजार लोकांच्या मृत्यूचा अंदाज संशोधनातून पुढे आला आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येचा आणि लस उत्पादनाचा विचार केल्यास संपूर्ण देशात लसीकरणाला अजून ७-८ महिने लागतील आणि तोपर्यंत देशभरात तब्बल १०-१२ लाख लोकांचा कोरोनाने मृत्यू होऊ शकतो असं जागतिक आकडेवारीत अंदाज वर्तविण्यात आला आहे.

जिथे मोठे देश जवळपास संपूर्ण लसीकरणाच्या शेवटच्या टप्यात आहे, तेव्हा भारतात त्याला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. यावरून देशातील सरकार किती सुस्त आहे याचा प्रत्यय येतो आहे. मात्र मोदी लाटेत आमदार झालेल्या अतुल भातखळकरांसारख्या ‘लाटेवरील आमदारांना’ मोदींची प्रतिमा जपण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं पाहायला मिळतंय. कारण त्यांनी अशाच एका विषयावर एक अतुलनीय ट्विट करताना मृत्यमुखी पडणाऱ्या लोकांच्या आकडेवारीकडे दुर्लक्ष करत केवळ मोदींच्या जजयकराचा ‘डंका’ वाजवल्याचं पाहायला मिळतंय.

यासंदर्भात ट्विट करताना आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलंय की, “भारताची एकूण लोकसंख्या लक्षात घेता लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सिरम दरमहा १० कोटी तर भारत बायोटेक दरमहा ७.८ कोटी डोस बनवणार आहे. देशाचे लवकरात लवकर लसीकरण करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मोदी सरकारतर्फे करण्यात येणार्‍या अतुलनीय कार्याला मानाचा मुजरा

 

News English Summary: Considering the total population of India, Serum will make 100 million doses per month and India Biotech will make 7.8 million doses per month to speed up vaccination. Respect for the incomparable work being done by the Modi government to bring the corona under control by vaccinating the country early said MLA Atul Bhatkhalkar.

News English Title: BJP MLA Atul Bhatkhalkar tweet on vaccination program news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AtulBhatkhalkar(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या