13 January 2025 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | महिलांनो 2 वर्षांत 2 लाख रुपये मिळवायचे असतील तर 'या' योजनेत पैसे गुंतवा, मजबूत फायदा होईल Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर 45 टक्क्यांनी घसरला, आता तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: RVNL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Penny Stocks | 82 पैशाच्या पेनी शेअरने होतेय मल्टिबॅगर कमाई, यापूर्वी दिला 720% परतावा, डिटेल्स नोट करा - Penny Stocks 2025 IPO GMP | पैसे तयार ठेवा, 4 नवीन IPO लाँच होत आहेत, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड जाणून घ्या - IPO Watch IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ICICI डायरेक्ट ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA
x

राष्ट्रवादीचे उत्तर महाराष्ट्रात पक्ष मेळावे | खडसेंपुढे भाजपच्या संकटमोचकांची संकटं संपेना

BJP MLA Girish Mahajan, Jamaner constituency, Eknath Khadse, North Maharashtra

नंदुरबार, ३ ऑक्टोबर : एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील जाहीर प्रवेशानंतर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत जोरदार पदाधिकारी मेळावे आयोजित करण्याचा सपाटा लावला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि एकनाथ खडसेंच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीचा पक्ष मेळावा पार पडला. दुसरीकडे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांना काल रावेरमध्ये राजकीय धक्के दिल्यानंतर अजूनही धक्के सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे.

भारतीय जनता पक्षाचे ‘संकटमोचक’ नेते अशी ओळख असलेले माजी मंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात खडसेंनी सुरुंग लावत राजकीय शक्तीचं प्रदर्शन सुरूच ठेवलं आहे. जामनेरमधील भारतीय जनता पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फौजच गाड्या भरून आणण्यात आली आणि त्यांना राष्ट्रवादी पक्षात अधिकृत प्रवेश देत संकटमोचक गिरीश महाजन यांच्यासमोरील संकट कायम राहतील याची काळजी घेतली आहे.

मागील अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षातून एनसीपीत पदाधिकारी-कार्यकर्त्यांचं जोरदार आऊटगोइंग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील भारतीय जनता पक्षाचे दोनशेपेक्षा अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाला कायमचा पक्षाला रामराम ठोकला. एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीत त्यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यावेळी उपस्थित होत्या.

 

News English Summary: After the public entry of Eknath Khadse in the NCP, the NCP in North Maharashtra has planned to organize a strong office bearers’ meeting in the presence of Eknath Khadse. Home Minister Anil Deshmukh and Eknath Khadse were present at the NCP rally in Nandurbar. On the other hand, after BJP’s political Sankatmochak Girish Mahajan was given a political shock in Raver yesterday, the shock is still going on.

News English Title: BJP MLA Girish Mahajan Jamaner constituency many BJP leaders joins NCP in the presence of Eknath Khadse news updates.

हॅशटॅग्स

#Ekanath Khadse(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x