22 January 2025 1:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

फडणवीसांची लोकप्रियता खुपत असल्यानेच आकसबुद्धीने निर्णय घेतला - पडळकर

BJP MLA Gopichand Padalkar, Thackeray government, Security reducing

सांगली, १० जानेवारी: माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा मुंबई पोलिसांनी अहवाल दिल्यानंतरसुद्धा ही त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांसोबतच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सुरक्षेत कपात केली आहे.

रात्री उशीरा फडणवीसांना असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेतून पायलट वाहन आणि बुलेटप्रुफ गाडी काढून घेण्यात आली. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमधील उच्चपदस्थ मंत्री अधिकाऱ्यांच्या बैठकीत नेत्यांना मिळणाऱ्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला.

याविषयी बोलताना भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडी सरकारला मुळातच देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता खुपत आहे. त्यामुळे, आकसबुद्धीने सरकारने हा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या सोबत या महाराष्ट्रातील पीडित, उपेक्षित, गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आहेत. तेच त्यांचे सुरक्षा कवच आहे. देवेंद्र फडणवीसांना या सुरक्षेची मुळातच गरज नाही. जे लोक घराभोवती सुरक्षा घेऊन घरात बसले आहेत त्यांची सुरक्षा काढण्याची खरी गरज आहे. महाविकास आघाडी कपटनितीने व सूडबुद्धीने हा निर्णय घेत आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या हे लक्षात येत आहे”, असे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले आहे.

 

News English Summary: Bharatiya Janata Party MLA Gopichand Padalkar has targeted the Thackeray government. The Mahavikas Aghadi government is basically losing the popularity of Devendra Fadnavis. Mahavikas Aghadi is taking this decision with deceit and revenge. The people of Maharashtra are realizing this, ”said MLA Gopichand Padalkar.

News English Title: BJP MLA Gopichand Padalkar criticised Thackeray government over security reducing news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x