23 February 2025 2:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा | भाजप आ. पडळकरांची रोहित पवारांवर जहरी टीका

BJP MLA Gopichand Padalkar, NCP MLA Rohit Pawar, Potholes on Karjat roads

मुंबई, १० ऑक्टोबर : ‘पंतप्रधान नरेंद मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावरून टीकाकारणारे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना उंची वाढल्यासारखे वाटते. परंतु, शरद पवार यांच्या खांद्यावर बसून ते स्वतःची उंची मोजतात. तुम्ही शरद पवार यांच्या खांद्यावरून उतरा म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही किती खुजे आहे हे कळेल’ अशा शब्दांत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली.

गोपीचंद पडळकर हे करमाळा येथून औरंगाबादच्या दिशेने आज सकाळी जात होते. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील अहमदनगर करमाळा महामार्गावरील पडलेल्या खाड्यांमुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्या पडळकर यांनी मिरजगाव येथे आल्यानंतर तेथील लोकांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी खराब रस्त्यावर उभा राहून व्हिडीओ बनवला आणि रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

‘गेल्या पन्नास वर्षापासून नेतृत्व करणारे शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. मी आज औरंगाबादला दौऱ्यानिमित्त चाललो असताना त्यांच्या मतदारसंघात प्रवेश केल्यापासून रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत. रोहित पवार रोज हे ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सल्ले देत असतात. त्यांना त्यांची उंची फार वाढल्या सारखी वाटते. पण त्यांना अजून माहिती नाही, शहर पवारांच्या खांद्यावर बसून ते त्यांची उंची मोजतात. असा जहरी टीका पडळकर यांनी केली आहे.

‘रोहित पवार तुम्ही शरद पवार यांच्या खांद्यावरून खाली उतरा, म्हणजे तुम्ही किती खुजे आहात, हे तुम्हाला कळेल. मिरजगाव मधील गावातील साधा रस्ता तुम्हाला करता येत नसेल, आणि देशाच्या नेतृत्वांना तुम्ही सल्ले देत असाल, तर हे सल्ले देण्यापेक्षा कर्जत मतदारसंघातील हे रस्ते दुरुस्त करा. राज्यामध्ये तुमचे सरकार आहे. येत्या काही दिवसात कर्जत-जामखेड मतदारसंघातील रस्ते तुम्ही लवकरात-लवकर दुरुस्त करावे, व मग बाकीच्यांना सल्ले द्यावेत, एवढीच विनंती करतो,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

 

News English Summary: BJP MLA Gopichand Padalkar was on his way to Aurangabad from Karmala this morning. The road is in bad condition due to potholes on Ahmednagar-Karmala highway in NCP MLA Rohit Pawar’s constituency. After Padalkar came to Mirajgaon, he had discussions with the people there. He then made a video of himself standing on a bad road and strongly attacked Rohit Pawar.

News English Title: BJP MLA Gopichand Padalkar criticized NCP MLA Rohit Pawar over potholes on roads in Karjat Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x