16 April 2025 2:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
x

पंढरपूर-मंगळवेढा | पडळकरांनी आवताडेंना बारामतीतील निकालाची आठवण करून दिली?

BJP MLA Gopichand Padalkar, Pandharpur Mangalvedha,  by poll election, MLA Bharat Bhalke

पंढरपूर, ३० मार्च:

पंढरपूर, ३० मार्च: राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघांची निवडणुक १७ एप्रिलला होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून माहिती दिली होती. सध्या भारत भालके यांच्या कुटुंबियांबद्दल मतदारसंघात भावनिक वातावरण असल्याने त्याचा फायदा भगिरथ भालके यांना होण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या दोन्ही बाजूंनी प्रचाराची तयारी सुरु झाली असून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरु आहेत.

भाजपने देखील मतदारसंघात बैठका सुरु केल्या आहेत. मात्र भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बारामतीच्या निवडणुकीतील स्वतःचा अनुभव सांगताना अप्रत्यक्षरित्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात देखील तीच भीती व्यक्त तर केली नाही ना अशी शंका येऊ शकते. यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, “बारामतीत डिपॉझिट जप्त झाल्यावर कुणी तिकीट देईल का, पण मला दिलं. माझी आमदार होण्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली. तशीच इच्छा समाधान आवताडेंची आहे, त्यांची इच्छाही पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत पूर्ण होईल”, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला. ते पंढरपुरात बोलत होते. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने इथे पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडे भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात भाजपने समाधान आवताडे यांना मैदानात उतरवलं आहे.

आता हे पाहावं लागणार आहे की समाधान आवताडे यांना देखील पडळकर यांच्याप्रमाणे विधानसभेचा अनुभव तर येणार नाही ना? दरम्यान, या दोन्ही उमेदवारांचे अर्ज आज दाखल करण्यात आले. समाधान आवताडेंच्या पहिल्या प्रचार सभेदरम्यान भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली. भारतीय जनता पक्षाचे फायरब्रँड नेते गोपीचंद पडळकर यांनी यावेळी अनेक मुद्यांना हात घातल्याचं पाहायला मिळालं.

 

News English Summary: Speaking on the occasion, Gopichand Padalkar said, “Will anyone give me a ticket in Baramati after the deposit is confiscated, but it was given to me. My wish to become an MLA was fulfilled. The same wish is satisfied.

News English Title: BJP MLA Gopichand Padalkar talked on Pandharpur Mangalvedha by poll election news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#GopichandPadalkar(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या