17 April 2025 3:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉकबाबत तज्ज्ञांचे महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

सदिच्छा भेटीआडून भाजप मनसे पदाधिकाऱ्यांना गळाला लावणार? | भाजप आमदार मनसे शाखेत

MLA Gopichand Padalkar

मानखुर्द, ०९ ऑगस्ट | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत भारतीय जनता पक्ष करणार नसल्याचे जवळपास निश्चित झालं आहे. काही दिवस अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमुळे चर्चांना चांगलाच उधाण आलं होतं. जिथे भाजप मनसे युतीची चर्चा आहे तिथे या दोघांच्याही भेटीगाठी वाढल्या आहेत.

मनसे पदाधिकाऱ्यांना सदिच्छा भेटीकडून गळाला लावणार?
कारण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनसे कार्यलायाला भेट दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे मानखुर्दला आले असता त्यांनी मनसे विभाग प्रमुख जगदीश खांडेकर यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी जगदीश खांडेकर यांनी पडळकर यांचे स्वागत केले. या भेटीत दोघांमध्ये स्थानिक राजकीय मुद्द्यांवर चर्चाही झाली. मात्र ही सदिच्छा भेट असली तरी भाजपच्या मनात मनसे नेत्यांना गळाला लावणे अशी योजना तर नाही ना अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईला भेट झाली आहे. त्यांच्या या भेटीवरून राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. भाजप-मनसे युती अशी चर्चा एकीकडे रंगात असताना, मनसे सोबत नाही असं मोठा विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. भेट होणं हे स्वाभाविक आहे, त्यात अन्य काही नाही, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. मात्र आता खालच्या स्तरावर मनसे पदाधिकाऱ्यांना भेटणं सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. आता हे प्रकार किती शाखा आणि तालुक्यात होणार ते देखील महत्वाचं ठरणार आहे.

भाजपचा थिंक टॅंक:
भाजपचा थिंक टॅंक सर्वकाही नियोजन पद्धतिने करत असतो आणि त्यात नैसर्गिक घडणारं असं काहीच नसतं. सध्या राज ठाकरेंच्या भेटी घेऊन भाजपने मनसे कार्यकर्त्यांना कधीच सत्यात न उतरणारं युतीचं लोपिपॉप दाखवलं आहे. त्यामुळे मनसे पदाधिकारी देखील जोशमध्ये भाजप नेत्यांना भेटतील. पण त्याचा उपयोग भाजप शिवसेना मजबूत असलेल्या प्रभागात करेल अशी शक्यता आहे. आणि त्यासाठी तशा प्रभागात भाजप नेत्यांच्या भेटी वाढतील असं राजकीय चक्र असण्याची शक्यता नाकारता येतं नाही. मात्र यापासून मनसे पदाधिकारी किती सावध असतील याचीच शंका आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP MLA Gopichand Padalkar visited MNS Mankhurd Shakha news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या