23 December 2024 12:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

साताऱ्यात भाजप खासदार विरुद्ध भाजप आमदार | 'ते' थापांचा पाऊस पाडण्यात माहीर | उदयनराजेंवर जोरदार टीका

MP Udayaraje Bonsale

सातारा, २३ ऑगस्ट | मागील साडेचार वर्षांत सत्ताधाऱ्यांनी पालिकेला फक्त लुटण्याचे काम केले. आता निवडणूक जवळ आल्याने विकासकामांचा पाऊस भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्ताधारी थापांचा पाऊस पाडण्यात माहीर असले तरी हा केवळ निवडणुकीचा मोसमी पाऊस आहे. त्यामुळे पालिकेतील ‘कचरा’ हळूहळू हद्दपार करण्याची वेळ जवळ आली आहे, असा उपरोधिक टोला भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.

सातारा पालिकेच्या आगामी बैठकीतील दाव्यांवरून खासदार उदयनराजेंवर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची जोरदार टीका (BJP MLA Shivendra Raje Bhosale criticized BJP MP Udayanraje Bhosale in Satara) :

विकासकामांचा पाऊस दाखवून भुलवण्याचा उद्योग:
सातारा पालिकेच्या आगामी बैठकीत विविध विकास कामांसाठी तरतूद केली असल्याची माहिती खासदार उदयनराजेंनी दिली आहे. त्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्राद्वारे टिका केली आहे. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात म्हटले आहे, “गेल्या साडेचार- पावणेपाच वर्षात सातारा पालिकेत सत्ताधारी आघाडीतील नगरसेवकांमध्ये टेंडर टक्केवारीसाठी लागणारी कळवंड सातारकर उघड्या डोळ्याने पाहत आले आहेत. या कळवंडीवर पडदा टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न नेत्यांना अनेकदा करावा लागला. नेते भ्रष्टाचार खपवून घेत नाहीत असा नुसता ढोल बडवून अन् डांगोरा पिटून पालिकेतील भ्रष्ट कारभाराचे सत्य लपवण्याचा प्रयत्न अनेकदा झाला. वास्तविक सातारा पालिकेला सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे कुरन बनवले असून सत्ताधाऱ्यांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. आता परवाच निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेसंदर्भात सूचना काढल्याने सत्ताधाऱ्यांनी विकासकामांचा पाऊस दाखवून नागरिकांना भुलवण्याचा उद्योग सुरु केला आहे.

साधे आयसोलेशन सेंटर केलं नाही:
निवडणूक आयोगाने सूचना थोडी उशिरा काढली असती तर सातारकरांना हा थापेबाजी पाऊस आज दिसला नसता, हा कथित विकासकांचा पाऊसही लांबला असता. नेत्यांनी पत्रकबाजी करून पाडलेला पाऊस हा निवडणुकीचा मोसम आल्यानेच पडला आहे. अख्ख्या टर्ममध्ये सत्ताधाऱ्यांनी कमिशन आणि टक्केवारीसाठी एकमेकांची गचुंडी धरली, घरकुल योजना, घनकचरा प्रकल्प, घंटागाडी अशा सर्वच कामांमध्ये भ्रष्टाचार झाला. कमिशन तुला मिळतंय की मला अशी अजब स्पर्धाच सत्ताधाऱ्यांनी पालिकेत सुरु केली. हद्दवाढ होऊन आता वर्षभराचा कालावधी लोटला पण, हद्दवाढीतील नवीन भागासाठी एकही काम सत्ताधाऱ्यांनी केले नाही. कोरोना महामारीचा विळखा बसला असताना साधे एक आयसोलेशन सेंटर सुरु केले नाही आणि आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निघाले विकासकामांचा पाऊस पाडायला. (BJP MLA Shivendra Raje Bhosale criticized BJP MP Udayanraje Bhosale)

नगर पालिकांची वाॅर्डरचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. एकप्रकारे नोव्हेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सातारा पालिकेत भाजपचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. तर भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास आघाडी विरोधी पक्ष म्हणून कार्यरत आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP MLA Shivendra Raje Bhosale criticized BJP MP Udayanraje Bhosale in Satara news updates.

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x