22 January 2025 2:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

कोणाच्या मनात सध्या काय चाललंय कसं ओळखावं, अजित पवारांची त्या भेटीवर प्रतिक्रिया

BJP MLA Shivendra Raje Bhosale, Sharad Pawar, deputy CM Ajit Pawar

सातारा, २७ जून : सातारा जावळीचे भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. दरम्यान, शिवेंद्रराजे यांनी पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, पवारांसोबत झालेल्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, तर रखडलेल्या विकास कामांबाबत चर्चा झाल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

सातारा येथे एमआय़डीसीमध्ये बजाज कंपनीकडे चाळीस एकर जागा आहे. बजाज यांनी स्वतः कंपनी सुरू करावी किंवा जागा खाली करून दुसऱ्यासाठी द्यावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे केली आहे.

तत्पूर्वी, विधानसभा निवडणुकीनंतर एका साखर कारखान्याच्या कार्यक्रमात देखील जेव्हा शरद पवार आणि शिवेंद्रसिंहराजे यांची भेट झाली होती त्यावेळी मकरंद पाटील यांनी मध्यस्थी करत शिवेंद्र बाबांना पुन्हा आपल्याकडे घ्या अशा प्रकारची आर्जव केली होती. आज शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अजित पवार यांची घेतलेली भेट राजकीय भेट होती की शहरातील सर्वसामान्य प्रश्नांसंदर्भात भेट होती याबद्दल साता-यामध्ये उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.

दरम्यान शिवेंद्रसिंहराजे यांच्या देहबोलीवरून ते शरीराने भाजपामध्ये असले तरी मनाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्यासारखे वाटत होते. यावर शिवेंद्रराजेंनी सावध प्रतिक्रिया दिली असली तरी अजित पवार यांनी मात्र कोणाच्या मनात सध्या काय चाललंय कसं ओळखावं अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

 

News English Summary: Although Shivendra Raje has given a cautious response, Ajit Pawar has given an indicative response on how to identify what is going on in one’s mind.

News English Title: BJP MLA Shivendra Raje Bhosale Met Sharad Pawar And deputy CM Ajit Pawar News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x