27 April 2025 3:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | पीएसयू शेअरने दिला 353 टक्के परतावा, आता फायद्याची अपडेट आली, टार्गेट जाणून घ्या - NSE: SJVN Mazagon Dock Share Price | बिनधास्त खरेदी करावा हा मल्टिबॅगर शेअर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MAZDOCK Reliance Share Price | भरवशाचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RELIANCE Vikas Lifecare Share Price | 2 रुपये 55 पैशाचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI च्या या फंडात डोळे झाकून गुंतवणूक करा, 5 पटींनी पैसा वाढवा, सविस्तर जाणून घ्या
x

अन्यथा मराठा समाजाचं दुसरं सामाजिक पानिपत होईल | आ. शिवेंद्रराजेंचा गंभीर इशारा

BJP MLA Shivendraraje Bhosle, Maratha reservation

पुणे, २ नोव्हेंबर: सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजामध्ये प्रचंड राग आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने या संदर्भात जळगतीने पाउल उचलून तोडगा काढावा असं मत भाजपचे आमदार शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच पुढे या संदर्भात ते म्हणाले की मराठा समाजाला आपल्या हक्काचं आरक्षण हवं आहे. त्यामुळे इतर समाजाने व्यथित किंवा घाबरण्याची अजिबात गरज नाही असं देखील मत व्यक्त केलं आहे.

पुढे ते म्हणाले की, ‘इतिहासात मराठ्यांचे पानिपत झालं, असं नेहमी बोलून दाखवलं जातं. जर आता आपण संघटित राहिलो नाही तर आपल्याला समाजाचं दुसरं सामाजिक पानिपत होईल, असा गंभीर इशारा देखील या विषयावर बोलताना दिला आहे.

आज साताऱ्यात मराठा समाजाची गोलमेज परिषद सुरू आहे. या परिषदेला संबोधित करताना भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी ही स्पष्ट भूमिका मांडली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मराठा तरुण-तरुणींमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घेणं अत्यंत गरजेचं आहे, असं सांगतानाच महाविकास आघाडी सरकारने एमपीएससीच्या मेगा भरतीसह इतर विषयांमध्ये गडबड करू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: There is huge anger in the Maratha community as the Supreme Court has postponed the reservation of the Maratha community. Therefore, BJP MLA Shivendra Raje has expressed the view that the Mahavikas Aghadi government should take immediate steps to find a solution in this regard. He further said that the Maratha community wants reservation of their rights. Therefore, other societies have also expressed the view that there is no need to suffer or panic.

News English Title: BJP MLA Shivendraraje Bhosle reaction on Maratha reservation News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या