22 January 2025 10:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025
x

ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर पंकजा मुंडे आणि आ. सुरेश धस आमनेसामने

BJP MLA Suresh Dhas, Ex Minister Pankaja Munde, Sugarcane worker, Beed

बीड, २५ ऑक्टोबर: २१ रुपयांच्या पुढे दरवाढ मिळाली तर कोयता उचलून तोडणीला जाण्याचे पंकजा मुंडे (BJP Ex MLA and Minister Pankaja Munde) यांनी आदेश दिले आहेत. मात्र दुसरीकडे या घोषणेला विरोध करत भाजप आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) यांनी १५० टक्के वाढ झाल्याशिवाय एकही मजूर जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. ऊसतोड मजुरांच्या आंदोलनात (Sugarcane worker) फूट पडल्याचं चित्र आहे. कारण या प्रश्नावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान पंकजा मुंडे म्हणाल्या कि, आमच्या ऊसतोड कामगारांना १५० टक्के, १०० टक्के, ७० टक्के वाढ नको तर कमीत कमी प्रति टनाला २१ रुपये वाढ द्या, असे आवाहन पवार साहेबांना केलं आहे. अंबेजोगाई येथील आज कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी ऊसतोड मजुरांसंदर्भात मोठी घोषणा केली. यावर क्रिया प्रतिक्रिया उमटत आहेत. आमच्या ऊसतोड कामगारांना उद्या भगवान बाबांचे दर्शन घेऊन ऊसतोड करण्यासाठी कारखान्याला गाड्या भरण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य श्रमिक संघटना, गोपीनाथ मुंडे ऊसतोड संघटना, तसंच माझ्यासहित ११ संघटनांच्यावतीने, मुकादमांचं कमिशन साडे १८ टक्क्कांवरुन ३७ टक्के करण्यात यावं, ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये १५० टक्के वाढ करण्यात यावी तसंच वाहतूकदरांची दरवाढ करुन ती दरवाढ ५० टक्के करण्यात यावी, अशी आमची मागणी असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं. दरम्यान आम्हाला जोपर्यंत दरवाढ मिळत नाही तोपर्यंत ११ संघटनांचं आंदोलन सुरुच राहील, असा इशारा सुरेश धस यांनी दिलाय.सुरेश धस म्हणाले, तसंच साखर करखाना, मुकादम आणि ऊसतोड कामगार यांच्यातल्या व्यवहाराला कायदेशीर अधिष्ठान प्राप्त करुन द्यावी, अशीही मागणी असल्याचं धस यांनी सांगितलं आहे.

 

News English Summary: BJP Ex MLA and Minister Pankaja Munde has ordered to pick up the scythe and go for cutting if the price goes beyond Rs 21. On the other hand, BJP MLA Suresh Dhas has opposed this announcement and has taken a stand that no worker will go without a 150 per cent increase. There is a picture of a split in the sugarcane workers’ movement. Because BJP leader Pankaja Munde and MLA Suresh Dhas have come face to face over this issue.

News English Title: BJP MLA Suresh Dhas criticize BJP Ex MLA Pankaja Munde over Sugarcane worker Beed News Updates.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x