27 April 2025 9:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
e Filing Income Tax | पगारदारांनो, नवीन टॅक्स प्रणालीमध्ये 75000 रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन मिळणार नाही? मोठी अपडेट LIC Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या सरकारी फंडात, अनेक पटीने पैसा परतावा मिळतोय, सेव्ह करून ठेवा EPFO Passbook | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, EPF प्रक्रियेत मोठे बदल, हक्काच्या पैशाबाबत अपडेट Horoscope Today | 28 एप्रिल 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 28 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594 GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

स्थानिक राजकारणाच्या नावाखाली भाजप आमदारांच्या मनसे शाखेत भेटी वाढल्या | सापळा घट्ट होतोय? - सविस्तर वृत्त

Raj Thackeray

सोलापूर, ११ ऑगस्ट | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत भारतीय जनता पक्ष करणार नसल्याचे जवळपास निश्चित झालं आहे. काही दिवस अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमुळे चर्चांना चांगलाच उधाण आलं होतं. एकाबाजूला युती होणार नसल्याचे संकेत दिल्लीतून आले असताना भाजप आमदार मनसेच्या शाखांमध्ये एकामागून एक हजेरी लावू लागले आहेत. मात्र मनसे पदाधिकारी याला केवळ फोटो काढण्यापुरतीचं राजकारण समजत आहेत असं प्रथम दर्शनी दिसतंय.

सोलापूर उत्तरचे भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर कार्यालयाला भेट दिली. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार देशमुख यांचं उत्साहात स्वागत केलं. आमदार साहेबांनीही मनसे पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर छानपैकी गप्पा मारल्या. त्यामुळे मनसे भाजपचं मिलन नक्की होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगायला सुरुवात झाल्या आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत माझे जुने संबंध आहेत… त्यांनीच मला भेटीचे निमंत्रण दिले होते, असा खुलासा आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला आहे. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भेटीसाठी निमंत्रण दिलं होतं, त्यांच्या आग्रह होता. आज कार्यालयाला भेट देऊन त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केल्याचं आमदार देशमुख यांनी सांगितलं.

सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका आणि शहरातील इतर घडामोडीवर यावेळी मनसे च्या कार्यकर्त्यांबरोबर भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांची चर्चा झाली. मात्र युती किंवा आघाडी यावर कसली चर्चा झाली नसल्याचं आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्पष्ट केलं.

यापूर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे मनसेच्या मानखुर्द शाखेत:
कारण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल मनसे कार्यलायाला भेट दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे मानखुर्दला आले असता त्यांनी मनसे विभाग प्रमुख जगदीश खांडेकर यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी जगदीश खांडेकर यांनी पडळकर यांचे स्वागत केले. या भेटीत दोघांमध्ये स्थानिक राजकीय मुद्द्यांवर चर्चाही झाली. मात्र ही सदिच्छा भेट असली तरी भाजपच्या मनात मनसे नेत्यांना गळाला लावणे अशी योजना तर नाही ना अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.

राज ठाकरेंनी पवारांची मुलखात घेतली आणि..
२०१९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्यानंतर मनसे आणि राष्ट्रवादीची राजकीय जवळीक वाढली होती. त्यानंतर विरोधकांच्या राजकारणापुढे घरंगळत जाणारा मनसे कार्यकर्ता मनसेपेक्षा राष्ट्र्वादीसाठी समाज माध्यमांवर भिडताना दिसला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी राष्ट्रवादीने मनसेसोबत मत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली स्वतःची मतपेटी वाढवली आणि मनसेची मतपेटी घटल्याचे पाहायला मिळाले. आज बऱ्याच प्रमाणावर मनसे पदाधिकारी भाजप युती करणार या अपेक्षेने भाजप आमदारांचे शाखेत सत्कार करून स्वतःच्या पायावर धोंडे मारून घेत आहेत आणि स्वतःच्या पक्ष विस्तारापेक्षा भाजपसाठी पोषक वातावरण निर्माण करत आहेत.

भाजपचा थिंक टॅंक:
भाजपचा थिंक टॅंक सर्वकाही नियोजन पद्धतिने करत असतो आणि त्यात नैसर्गिक घडणारं असं काहीच नसतं. सध्या राज ठाकरेंच्या भेटी घेऊन भाजपने मनसे कार्यकर्त्यांना कधीच सत्यात न उतरणारं युतीचं लोपिपॉप दाखवलं आहे. त्यामुळे मनसे पदाधिकारी देखील जोशमध्ये भाजप नेत्यांना भेटतील. पण त्याचा उपयोग भाजप शिवसेना मजबूत असलेल्या प्रभागात करेल अशी शक्यता आहे. आणि त्यासाठी तशा प्रभागात भाजप नेत्यांच्या भेटी वाढतील असं राजकीय चक्र असण्याची शक्यता नाकारता येतं नाही. मात्र यापासून मनसे पदाधिकारी किती सावध असतील याचीच शंका आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP MLAs visiting frequency in MNS skhakha is highly increasing news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या