सेनेचा मुख्यमंत्री झाल्याच्या धक्क्यातून भाजप नेते सावरले नाहीत? म्हणाले सरकार मे-जून'मध्ये कोसळणार

नागपूर: कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. ‘राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार येत्या मे-जून महिन्यापर्यंत कोसळेल’, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि विधानपरिषदेतील आमदार गिरीश व्यास यांनी केला. इतकंच नाही तर भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केल्याचंही गिरीश व्यास म्हणाले.
कर्नाटक निकालानंतर राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या गटात हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर निवडणुकीत संपूर्ण बहुमत मिळेल असा आम्हाला विश्वास आहे, असं गिरीश व्यास यांनी सांगितलं.
तर जनतेने नाकारलेले पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र येतात,जनादेशाचा अपमान करून संधीसाधू राजकारण करतात,त्यानंतर पहिली संधी मिळताच जनता त्यांना कसा धडा शिकविते,याचे उदाहरण कर्नाटकच्या जनतेने दाखवून दिले आहे.जनादेश व जनतेच्या इच्छेविरोधात जाण्याचे परिणाम कर्नाटक निकालांनी दाखवून दिले आहेत असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने दिलेला जनादेश हा भारतीय जनता पक्ष-शिवसेना, रिपाई, रासपा, शिवसंग्राम अशा सर्व घटक पक्षांना होता. असं असून देखील सरकार बनविण्यासाठी शिवसेना राजी नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान न करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेला सरकार बनवायचे असेल तर त्यासाठी आमच्या शुभेच्छा!,” असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजभवनवरून बाहेर आल्यावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती.
भारतीय जनता पक्ष जनादेशाचा किती आदर करतं याची उजळणी केल्यास भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रसार माध्यमांच्यासमोर येण्याचं धाडस होणार नाही. अगदी देशभरातील ४ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे दाखले द्यायचे झाल्यास, गोव्यामध्ये काँग्रेसला १७ जागा भारतीय जनता पक्षाला १३, मणिपूरमध्ये काँग्रेसला २८ जागा भारतीय जनता पक्षाला २१ जागा, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलला ८० तर जनता दल युनायटेडला ७१ आणि भारतीय जनता पक्षाला ५३ जागा, मेघालयमध्ये भारतीय जनता पक्षाला केवळ २ तर काँग्रेसला २१ आणि नॅशनल पीपल्स पार्टीला १९ जागा होत्या,” तरी या राज्यांमध्ये घोडेबाजार करत भाजपने सत्तास्थापन केल्याचा इतिहास आहे. अशा अनेक राज्यांमध्ये जनमताचा कौल भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध असताना देखील भारतीय जनता पक्षाने राज्य काबीज केली आणि त्याला अमित शहांची चाणक्यगिरी असं संबोधलं आणि आज हाच पक्ष आणि त्यांचे नेते इतर पक्षांना नैतिकतेचे डोस पाजताना दिसत आहेत हे विशेष म्हणावे लागेल.
BJP ML Girish Vyas Claims that Maharashtra Thackeray Government will be Collapse till May June
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB