MPSC परीक्षा घेतल्यास वाईट परीणाम भोगावे लागतील | परीक्षा केंद्रं बंद पाडू
नवी मुंबई, ७ ऑक्टोबर : आज नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षण परिषदेमध्ये मराठा आरक्षणावरून संभाजीराजे छत्रपती (MP Chhatrapati Sambhaji Raje) यांनी आक्रमक भूमिका मांडली. तसेच मराठा आरक्षणाच्याबाबत राज्य सरकारने मराठा समाजाला फसवले असून, सरकारच्या हाती असलेल्या गोष्टीही राज्य सरकार करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच एमपीएससी परीक्षेबाबत राज्य सरकारने मराठा समाजाचं ऐकलं नाही तर मराठा समाज एमपीएससी केंद्र बंद पाडेल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.
MPSC ची परीक्षा घेण्यासाठी सरकार घाई का करतं आहे? यामागे काही षडयंत्र आहे का कळत नाही. ज्यांची वयाची मर्यादा संपेल त्यांची वयाची अट शिथिल करुन मर्यादा वाढवा सर्वांना सोबत घेऊन चला अशी माझी सरकारला सूचना आहे असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
#VIDEO – आज नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षण परिषदेमध्ये मराठा आरक्षणावरून संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका मांडली. pic.twitter.com/ODvT9H0uxH
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) October 7, 2020
राज्य सरकार ऐकत नसेल तर मराठा समाज एमपीएसीची केंद्रं बंद करेल असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे. मराठा समाजातील वकिलांनी काय करायला हवं हे ठरवावं, आंदोलनाची दिशा ठरवावी. मराठा समाज आक्रमक झाला आहे. आत्तापर्यंत अनेक लोकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र बंद करणार नाही मात्र मराठा समाज एमपीएससीचे केंद्र बंद करेल असाही इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे.
उदयनराजेंनी फिरवली बैठकीकडे पाठ:
दरम्यान, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईतील माथाडी भवनात बुधवारी मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे खासदार संभाजी राजे छत्रपती हे दोघेही एकत्रित उपस्थित राहणार असल्याची माहिती होती; परंतु उदयनराजेंनी या बैठकीकडे पाठ फिरवली. महिनाभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेल्या एसईबीसी आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात मराठा समाजामध्ये संतापाचे वातावरण पसरलेले आहे.
News English Summary: MP Chhatrapati Sambhaji Raje played an aggressive role on Maratha reservation in the Maratha Reservation Council held in Navi Mumbai today. He also accused the state government of cheating the Maratha community regarding Maratha reservation and not doing what is in the hands of the government. Also, if the state government does not listen to the Maratha community regarding the MPSC exam, the Maratha community will close the MPSC center, Sambhaji Raje warned.
News English Title: BJP MP Chatrpati Sambhaji Raje Allegations On Thackeray Government Over Maratha Reservation Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो