23 February 2025 12:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

१० ऑक्टोबरच्या महाराष्ट्र बंदला माझा पाठिंबा नाही | मराठा समाजात दोन गट

BJP MP Chhatrapati Sambhajiraje, Maratha Reservation, Maharashtra bandh, Maratha Kranti Morcha

मुंबई, २ ऑक्टोबर : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून पुन्हा वातावरण पेटणार असं चित्र निर्माण झालंय. 9 ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 10 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र बंद ठेवणार अशी घोषणा सुरेश पाटील यांनी मराठा आरक्षण संघर्ष समितीच्यावतीनं देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अनेक मराठा संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. सुरेश पाटील यांनी ईडब्ल्यूएस (EWS) आरक्षण तात्काळ लागू करा, नोकरभरती बंद करा अशा मागण्या समोर ठेवत बंदचा इशारा दिला होता. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कडकडीत बंद पाळला जाईल असा इशारा दिला होता.

मात्र सध्या खासदार संभाजीराजे महाराष्ट्र बंद घोषणे संदर्भात समाधानी नाहीत. याबाबत छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, माझा महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही, कोरोनाचा संसर्ग आहे. त्यामुळे बंद नकोच, बंद पुकारणारे मराठा समाजातील नेते नाहीत. त्यांच्या बंदला मराठा समाजातून पाठिंबा नाही, महाराष्ट्र बंद करुन काही फायदा होईल का? मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा निकाल असतो, तो मान्य करावा लागतो. स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज दुखी आहे असं त्यांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सांगितले.

तसेच सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षणावरील स्थगिती उठत नाही तोवर समाजाला ईडब्ल्यूएसचं १० टक्के आरक्षण घ्यावं असं मंत्री अशोक चव्हाणांनी मला फोन करुन सांगितले. परंतु यास आम्ही नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. EWS आरक्षण एका जातीसाठी नाही, ते सर्व खुल्या प्रवर्गासाठी आहे. जर हे आरक्षण घेतले तर सुप्रीम कोर्टात मराठा समाजाचा कोणताही दावा राहणार नाही म्हणून मी त्यांना EWS आरक्षण घेणं धोक्याचं असल्याचं सांगितलं अशी माहिती खासदार संभाजीराजेंनी दिली.

 

News English Summary: Inspite of the Maharashtra cabinet extending EWS reservation benefits to the powerful Maratha community, a round table conference held by Maratha leaders in Kolhapur on Wednesday, has decided to call a state-wide bandh on October 10. The Maratha Kranti Morcha had recently staged a protest in Thane along with Mumbai’s Dabbawalas demanding the government to take appropriate steps. The Maratha community comprise 30% of the state’s population.

News English Title: BJP MP Chhatrapati Sambhajiraje do not support Maharashtra bandh Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x