22 January 2025 10:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025
x

उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबाबतही कोत्या मनाचे राजकारण केले - नारायण राणे

BJP MP Narayan Rane, CM Uddhav Thackeray, Raj Thackeray

मुंबई, ०२ एप्रिल: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

मात्र या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बंधु राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेले नव्हते. या मुद्द्यावरुन उलटसुलट चर्चाही रंगल्या होत्या. अनेकांनी मुख्यमंत्र्यावर टीकाही केली. आता भाजपचे खासदार नारायण राणे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मोठ्या मनाने कुठलीही अडचण येऊ दिली नाही. सर्व प्रकारच्या परवानग्या तात्काळ देण्यात आल्या. मात्र आता भूमिपूजनावेळी त्यांना बोलावण्यात आले नाही. जितका सन्मान मुख्यमंत्र्याचा असतो तेवढाच सन्मान विरोधी पक्षनेत्याचाही ठेवावा लागतो, हे उद्धव ठाकरे विसरले असतील. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षातील नेते असल्याने सूडबुद्धीने त्यांना बोलावण्यात आले नसेल हे आम्ही समजू शकतो. मात्र ठाकरे घराण्यातील सदस्य असलेले राज ठाकरेंनाही बोलवले नाही. त्यांच्या घरासमोर कार्यक्रम असताना त्यांना निमंत्रण न देणे म्हणजे कोत्या मनाचे राजकरण होय, असा टोलाही त्यांनी लगावला.

 

News English Summary: A ground-breaking ceremony of the late Balasaheb Thackeray’s memorial was held on Wednesday in the presence of Chief Minister Uddhav Thackeray. The function was attended by Chief Minister Uddhav Thackeray, Deputy Chief Minister Ajit Pawar and former Congress state president and revenue minister in the state government Balasaheb Thorat. Opposition leader Devendra Fadnavis and Chief Minister Uddhav Thackeray’s brother Raj Thackeray were not invited to the event. There was a lot of discussion on this issue. Many also criticized the Chief Minister. Now BJP MP Narayan Rane has also targeted Chief Minister Uddhav Thackeray.

News English Title: BJP MP Narayan Rane criticized CM Uddhav Thackeray over late Balasaheb Thackeray’s memorial ceremony news updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x