22 December 2024 9:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

उद्धव ठाकरेंचा कधीच मराठा आरक्षणाला पाठिंबा नव्हता | खा. नारायण राणेंचा प्रहार

BJP MP Narayan Rane, CM Uddhav Thackeray, Maratha reservation, Marathi News ABP Maza

मुंबई, १७ सप्टेंबर : मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे राज्यभर वातावरण तापलं आहे. अशात विरोधकांनीही ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. यातच आता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उदासीनतेमुळे मराठा समाजाला आरक्षणाला मुकावे लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कधीच मराठा आरक्षणाला पाठिंबा नव्हता. मी शिवसैनिक आहे त्यामुळे मला माहित आहे.’ अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

जी पावलं आता टाकत आहेत. तशा बैठकी सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वा उद्धव ठाकरेंनी का नाही घेतल्या ?असा सवाल देखील माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. खरंतर मराठा आरक्षणाच्या मुद्दायवरून आज राज्यभर आंदोलन केलं जात आहे. अशात ठाकरे सरकारने पोलीस भरतीचा निर्णय घेतल्यामुळे मराठा समाज आणखी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

यासंबंधी त्यांनी ट्विटरवर एक ट्वीट केलं आहे ज्यामध्ये असं लिहलं की, ‘जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागु होत नाही तो पर्यंत मेघा भरती कशाला ??? आगीत तेल टाकत आहात. जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का??’ असा थेट सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, सरकारच्या या मेगा भरती निर्णयावर राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजी राजे यांनी सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती दिल्याने संतप्त भावना येत असताना राज्यात मेगा पोलीस भरतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र या पोलीस भरतीत मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षणाचा फायदा होणार नसल्याने अनेक मराठा नेत्यांनी भरती करु नये अशी आग्रही भूमिका घेतली. खासदार संभाजीराजेंनी राज्य सरकारवर टीका करत मराठा समाजात आक्रोश होईल असा इशारा दिला होता.

मराठा समाजाकडून येणाऱ्या प्रतिक्रिया लक्षात घेता राज्य सरकार मेगा पोलीस भरतीत मराठा समाजासाठी १३ टक्के जागा राखीव ठेवण्याबाबत विचार करत आहे. मराठा समाजाचं आरक्षण टिकावं यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. परंतु पोलीस भरतीत १३ टक्के जागा ठेवण्याबाबत कायदेशीर बाब तपासून पाहणार असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे.

 

News English Summary: Due to the indifference of Chief Minister Uddhav Thackeray, the Maratha community has had to cancel the reservation. Chief Minister Uddhav Thackeray never supported Maratha reservation. I am a Shiv Sainik so I know. ‘ In such words, Narayan Rane has sharply criticized Uddhav Thackeray.

News English Title: BJP MP Narayan Rane criticized on CM Uddhav Thackeray on Maratha reservation Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x