23 February 2025 8:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

समाजालाही वाटलं पाहिजे ना तुम्ही राजे आहात ! राणेंचा संभाजीराजेंवर प्रहार | पण कोणाच्या सांगण्यावर?

Maratha reservation

मुंबई, ०३ जून | संभाजीराजे छत्रपती हे सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाची आक्रमकता देखील वाढत चालली आहे. अशातच आता भाजप खासदार नारायण राणे यांनी संभाजीराजे यांच्यावर निशाणा साधला आहे. “ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात गेलो म्हणजे आरक्षणही मिळत नाही आणि कोणी पुढरीही होत नाही. समाजाला वाटलं पाहिजे ते राजे आहेत. लोकांमध्ये आस्था, आपुलकी, प्रेम निर्माण होण्यासाठी तसं कार्य करावं लागतं. मला संभाजीराजेंचा फोन आला होता. पण आमची भेट झालेली नाही.

संभाजीराजेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला असता मी मागेही म्हटले होते की राजेंनी आता राजीनामा देऊ नये. महाराजांचे नाव लागतं त्यांच्या नावाला म्हणून भारतीय जनता पक्षाने स्वतःहून त्यांना खासदारकी दिली होती. ती खासदारकी संपत असताना आता राजीनामा देऊ नये”, असा सणसणीत टोला नारायण राणे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना लगावला आहे. दरम्यान, संभाजीराजे आता नारायण राणेंच्या या टीकेला प्रत्यत्तर देणार का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

दरम्यान, सध्या संभाजीराजे छत्रपती यांना भाजपचे नेते मोठ्या प्रमाणावर लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र त्यांना लक्ष करणारे भाजपमधील नेते निरनिराळे असले तरी त्यांना राज्यातीलच वरिष्ठ नेत्यांची फूस असल्याचं म्हटलं जातंय. तोच राज्य भाजपच्या नियोजित रणनीतीचा भाग असल्याचं म्हटलं जातंय.

 

News English Summary: Sambhaji Raje Chhatrapati is currently very aggressive on the issue of Maratha reservation. On the other hand, the BJP’s aggression on this issue is also increasing. Similarly, now BJP MP Narayan Rane has targeted Sambhaji Raje. Going from one district to another means that we don’t get reservation and no one gets ahead. The society should think that they are kings. We have to work like that to create faith, belongingness and love in people.

News English Title: BJP MP Narayan Rane criticized Sambhajiraje Chhatrapati over Maratha Reservation news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x